'पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं'; जय मेहतासोबत लग्न केल्यानंतर जुही चावलाला झाली होती ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 15:13 IST2024-04-04T15:12:35+5:302024-04-04T15:13:10+5:30

Juhi Chawla : जुही चावलाने बिझनेसमन जय मेहता यांच्याशी लग्न केलं आहे.

juhi-chawla-birthday-when-shahrukh-khan-salman-actress-trolled-after-marriage-with-jay-mehta | 'पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं'; जय मेहतासोबत लग्न केल्यानंतर जुही चावलाला झाली होती ट्रोल

'पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं'; जय मेहतासोबत लग्न केल्यानंतर जुही चावलाला झाली होती ट्रोल

90 च्या काळात अनेकांची क्रश असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुही चावला (Juhi Chawla). उत्तम अभिनयासह सौंदर्याची जोड असलेल्या जुहीने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. जुहीने १९८८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पाहता पाहता ती लोकप्रिय झाली. जुहीचं फिल्मी करिअर जितकं चर्चेत राहिलं. तितकंच तिचं खासगी आयुष्यदेखील चर्चिलं गेलं. जुहीने जय मेहता (Jay Mehta) यांच्याशी  लग्न केल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. जुहीने पैशांसाठी वयस्क व्यक्तीशी लग्न केलं असा आरोपही तिच्यावर करण्यात आला.

जय मेहता हे जुहीपेक्षा केवळ ६ वर्षांनी मोठे असल्याचं म्हटलं जातं. मात्र, ते तिच्यापेक्षा बरेच वयस्क दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं. जय मेहता यांचं हे दुसरं लग्न आहे. एका विमान दुर्घटनेत त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. ज्यानंतर त्यांनी जुहीशी दुसऱ्यांदा संसार थाटला. 

जुहीने जय मेहता यांच्याशी लग्न केल्याचं वृत्त मीडियामध्ये आल्यानंतर अनेकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. इतकंच नाही तर केवळ पैशांसाठी तिने जय यांच्याशी लग्न केल्याचंही लोकांनी म्हटलं. परंतु, जुहीने या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तिचा संसार नेटाने करुन दाखवला. दरम्यान, जुही आणि जय यांना दोन मुलंदेखील आहेत. जय मेहता प्रसिद्ध बिझनेसमन असून मेहता ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे ते चेअरमन आहेत.

Web Title: juhi-chawla-birthday-when-shahrukh-khan-salman-actress-trolled-after-marriage-with-jay-mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.