Jug Jug Jeeyo : या दिवशी रिलीज होणार वरूण धवन आणि कियारा आडवाणीचा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 19:42 IST2021-11-20T19:39:57+5:302021-11-20T19:42:25+5:30
वरूण धवन आणि कियारा आडवाणी जुग जुग जियो चित्रपटात झळकणार आहेत.

Jug Jug Jeeyo : या दिवशी रिलीज होणार वरूण धवन आणि कियारा आडवाणीचा चित्रपट
वरूण धवन आणि कियारा आडवाणी जुग जुग जियो चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण करण जोहरने चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. चित्रपटात वरूण धवन आणि कियारा आडवाणी यांच्यासोबत अनिल कपूर, नीतू सिंग आणि प्राजक्ता कोळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
करण जोहरने सोशल मीडियावर जुग जुग जियो चित्रपटाची झलक शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट २४ जून, २०२२ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
करण जोहरने जुग जुग जियो चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो लग्नाचे आहेत. या फोटोत वरूण धवन वराच्या आणि कियारा आडवाणी वधूच्या गेटअपमध्ये दिसते आहे. तसेच नीतू कपूर, अनिल कपूर आणि प्राजक्ता कोळी लग्नात खूप खूश दिसत आहे. करणने फोटो शेअर करत लिहिले की, जुग जुग जियो २४ जून, २०२२ला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या आमच्या सोबत फॅमिलीला सेलिब्रेट करा.
वरूण धवनने शेअर केला होता व्हिडीओ
नुकतेच वरूण धवनने एक व्हिडीओ कॉन्फरेन्सचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात अनिल कपूर, कियारा आडवाणी आणि नीतू सिंग बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओत वरूण आणि कियारा म्हणताना दिसते आहे की अनिल अंकल आणि नीतू आंटी कुठे आहे, डेट फायनल करायची आहे. वरूण म्हणाला की, अनिल सर सीनियर आहे. ज्यावर अनिल कपूर म्हणाला की, सीनिअर होगा तेरा बाप यार.