JUDWAA- 2 : सलमान खानने वरुण धवनला दिलेले सरप्राइज गिफ्ट काय असू शकते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 20:32 IST2017-02-07T15:02:47+5:302017-02-07T20:32:47+5:30

सलमान खान याचा १९९७ मध्ये आलेला सुपरहिट सिनेमा ‘जुडवा’ याचा सीक्वेल ‘जुडवा-२’ मध्ये वरुण धवन सलमानप्रमाणेच डबल रोलमध्ये दिसणार ...

JUDWAA-2: What could be the surprise gift given by Salman Khan to Varun Dhawan? | JUDWAA- 2 : सलमान खानने वरुण धवनला दिलेले सरप्राइज गिफ्ट काय असू शकते?

JUDWAA- 2 : सलमान खानने वरुण धवनला दिलेले सरप्राइज गिफ्ट काय असू शकते?

मान खान याचा १९९७ मध्ये आलेला सुपरहिट सिनेमा ‘जुडवा’ याचा सीक्वेल ‘जुडवा-२’ मध्ये वरुण धवन सलमानप्रमाणेच डबल रोलमध्ये दिसणार आहे. जेव्हा ही बाब सलमानला कळली तेव्हा त्याने वरुणला एक सरप्राइज गिफ्ट दिले आहे. या गिफ्टविषयी तुम्ही ऐकाल तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक सलमानने वरुणला त्याच्या काही जुन्या बॅगी जिन्स गिफ्ट केल्या आहेत. त्याचबरोबर एक नोटही दिली आहे. 

जेव्हा ही बाब वरुण याला कळली तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता सलमानला फोन करून या जिन्स मला सिनेमातील टपोरी लूकसाठी फायदेशीर ठरतील, असे म्हटले. वरुणचे हे शब्द सलमानला खूपच आवडल्याचे समजते. यावेळी वरुनने सलमानशी संबंधित एक किस्सा सांगितला. त्यामध्ये म्हटले की, जुडवाच्या ट्रायल शोदरम्यान सलमान खान सेटच्या बाहेर बनियन आणि शॉटर््स घालून उभा होता. मी त्याला बघताच अंकल म्हणून बोलावले. ही बाब सलमानला खूपच खटकली. त्याने लगेचच म्हटले की, ‘मी तुझ्या कानाखाली मारणार, एक तर मला अंकल म्हण किंवा भाई अन्यथा मी तुला मध्ये जाऊ देणार नाही’ सलमानच्या या पवित्र्यामुळे वरुण चांगलाच घाबरून गेला होता. 



जुडवा-२ ची शूटिंग सुरू करण्याअगोदर वरुण सलमान खान याला भेटला होता. कारण मला सलमानला नाराज करायचे नाही. आम्ही सर्वच लोक त्याचा सल्ला घेत असतो. त्याचा आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत असेल. मी सलमान खान, साजिद खान, डेव्हिड धवन आणि प्रेक्षकांना नाराज करू इच्छित नाही, असेही तो म्हणाला. 

जेव्हा वरुणला, तुझी सलमानबरोबर तुलना केली जात असल्याने तू घाबरत आहेस का? असे विचारण्यात आले तेव्हा वरुण म्हणाला की, मी बिलकुल अशाप्रकारचा विचार करीत नाही. तुम्ही लोक मला याबाबतची आठवण करून देत आहेत. एक अभिनेता म्हणून मी प्रेक्षकांसाठी सिनेमांमध्ये काम करीत आहे. जेव्हा मी एखादा चांगला सिनेमा करतो तेव्हा मी हा कधीच विचार करीत नसतो की, माझी प्राइज वाढायला हवी किंवा मला भरपूर अ‍ॅड्स मिळाव्यात. फक्त एकच उद्देश असतो की, प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन व्हावे, असेही वरुनने सांगितले. या सिनेमात वरुण बरोबर जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू दिसणार आहेत. सलमानचा जुडवा प्रेक्षकांना खूपच भावला होता. आता वरुणचा जुडवा-२ प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

Web Title: JUDWAA-2: What could be the surprise gift given by Salman Khan to Varun Dhawan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.