Judwaa 2 Song : सुनो, गणपति बप्पा मोरया; परेशान करे मुझे छोरियाँ..! वरूण धवनची बाप्पापुढे गोड तक्रार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 12:41 IST2017-08-31T07:11:27+5:302017-08-31T12:41:27+5:30
वरूण धवनचा ‘मच अवेटेड’ चित्रपट ‘जुडवा2’चा ट्रेलर तुम्ही बघितलाच. आता या चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. होय, ‘सुनो गणपति बप्पा मोरया’ असे शब्द असलेले हे गाणे अगदी काही क्षणांपूर्वी रिलीज झाले.

Judwaa 2 Song : सुनो, गणपति बप्पा मोरया; परेशान करे मुझे छोरियाँ..! वरूण धवनची बाप्पापुढे गोड तक्रार!!
व ूण धवनचा ‘मच अवेटेड’ चित्रपट ‘जुडवा2’चा ट्रेलर तुम्ही बघितलाच. आता या चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. होय, ‘सुनो गणपति बप्पा मोरया’ असे शब्द असलेले हे गाणे अगदी काही क्षणांपूर्वी रिलीज झाले. सगळीकडे उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असताना, वरूणचे हे गाणे तुमच्या उत्साहात भर घालणारे आहे. गाण्यात वरूणने गणपती बाप्पाकडे एक गोड तक्रार बोलून दाखवली आहे. ‘परेशान करे मुझे छोरियाँ’ अशी गोड तक्रार वरूणने बाप्पासमोर मांडली आहे. शिवाय बाप्पासमोर धमाकेदार डन्स केला आहे. या गाण्याचे शब्द आणि यातील वरूणचे पात्र पाहून तो यात पोट धरून हसवणार, हे तुम्हाला कळून चुकले असेलच. अमित मिश्राच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेले हे गाणे तुम्ही पाहायला हवेच.
ALSO READ : पाहा, ‘जुडवा2’चा धमाकेदार ट्रेलर...!!
यापूर्वी या चित्रपटाचे ‘चलती क्या ९ से १२’ हे गाणे तुम्ही पाहिले आहे. रिलीज झाल्यापासून हजारो लोकांनी हे गाणे पाहिले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनेही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. एकंदर काय तर अॅक्शन आणि जबरदस्त कॉमेडी असा मसाला असलेला हा चित्रपट तुम्हाला नक्कीच चित्रपटगृहांपर्यंत खेचून घेऊन जाईल.
१९९७ साली दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या ‘जुडवा’ या सुपरहिट चित्रपटात सलमान खानने दुहेरी भूमिका केली होती. तब्बल १९ वर्षांनंतर याच चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘जुडवा2’ पुन्हा तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या सीक्चलमध्येही तुम्हा-आम्हाला सलमान खान पाहायला मिळणार आहे. अर्थात केवळ दोन मिनिटांसाठी. होय, सलमान यात कॅमिओ करताना दिसणार आहे. सलमान चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये दिसणार आहे, तेही ठीक क्रेडिटच्या आधी. वरूण धवनचे डबल कॅरेक्टर राजा आणि प्रेम एका हॉटेलमध्ये रिअल राजा व प्रेम म्हणजेच सलमानला भेटतात, असा हा सीन असेल.