'जुदाई'तील हा चिमुरडा आज आहे बॉलिवूड स्टार, नाव समजल्यावर व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 10:28 AM2020-02-29T10:28:52+5:302020-02-29T10:30:03+5:30

बालकलाकार म्हणून काम केलेला हा अभिनेता आता बॉलिवूडचा स्टार बनला आहे

Judai Fame Child Artist Omkar Kapoor is now star of bollywood Tjl | 'जुदाई'तील हा चिमुरडा आज आहे बॉलिवूड स्टार, नाव समजल्यावर व्हाल चकीत

'जुदाई'तील हा चिमुरडा आज आहे बॉलिवूड स्टार, नाव समजल्यावर व्हाल चकीत

googlenewsNext

बॉलिवूडमधील बऱ्याचशा कलाकारांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात बालकलाकार म्हणून केली आहे. बालकलाकार म्हणून काम केलेल्या या कलाकारांना आता ओळखणं कठीण झालं आहे. अनिल कपूरचा जुदाई हा चित्रपट आठवतो आहे ना. या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेला हा अभिनेता आता बॉलिवूडचा स्टार बनला आहे. या अभिनेत्याचं नाव आहे ओमकार कपूर.का केली होती.


अनिल कपूरच्या जुदाई चित्रपटात ओमकार कपूरने अनिलच्या मुलाची भूमिका केली होती. हा चित्रपट1997 ला रिलीज झाला होता. आणि त्यावेळी हा चित्रपट सुपरहीट ठरला होता.

ओमकारने जुदाईप्रमाणेच चाहत, हिरो नं. 1, जुडवा, मासूम, मेला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या कलाकाराने काही वर्षांपूर्वी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आहे आणि त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता.


ओमकारचा प्यार का पंचनामा 2 हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने यू मी और घर आणि झुठा कही का यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.

झुठा कही का हा चित्रपट याच वर्षांत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याला ऋषी कपूर, जिमी शेरगिल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

Web Title: Judai Fame Child Artist Omkar Kapoor is now star of bollywood Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.