‘जुडवा 2’ शूटिंग होणार सुरू; रिलीजची तारीखही ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 20:00 IST2017-02-04T14:29:45+5:302017-02-04T20:00:56+5:30

दिग्दर्शक डेव्हिड धवन व निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी  ‘जुडवा २’  या चित्रपटाच्या शूटिंगला याच आठवड्यात सुरुवात होणार आहे. ...

'Jubva 2' shooting starts going on; Release date is also scheduled | ‘जुडवा 2’ शूटिंग होणार सुरू; रिलीजची तारीखही ठरली

‘जुडवा 2’ शूटिंग होणार सुरू; रिलीजची तारीखही ठरली

ग्दर्शक डेव्हिड धवन व निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्या आगामी  ‘जुडवा २’  या चित्रपटाच्या शूटिंगला याच आठवड्यात सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे ठिक वीस वर्षांपूर्वी ज्या दिवशी जुडवा रिलीज झाला होता त्याच दिवशी या चित्रपटाचा मुहूर्ताचा शॉट शूट केला जाणार आहे. 

‘जुडवा’ मध्ये सलमान खानने साकारलेली भूमिका यावेळी वरुण धवन साकारत आहे. वरुण धवनची यात दुहेरी भूमिका असून त्याच्या अपोझिट जॅकलिन फर्नाडिझ व तापसी पन्नू यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाविषयीची माहिती देताना डेव्हिड धवन म्हणाला, आम्ही २० वर्षांनंतर पुन्हा एक दा जुडवाच्या प्रवासावर जात आहोत. ही योग्य वेळ आहे. निर्माता साजिद नाडियाडवाल म्हणाला, मला असे वाटतेय की मी आताच जुडवावर काम केले आहे. तरी देखील हा नवा चित्रपटासाठी आम्ही उत्सुक आहोत. सलमान खान याने साजिद नाडियाडवाला आणि डेव्हिड धवन यांच्यासोबत काम केले होते. 



या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा वरुण धवन म्हणाला, मी लहाणपनापासूनच जुडवाचा फॅन आहे, यामुळेच माझ्यासाठी या चित्रपटाच्या दुसºया भागात काम करणे माझ्यासाठी विशेष आहे. मी साजिद सर आणि माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनात हा सिक्वल करणार आहे. माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला मंगळवारपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. यानंतर एप्रिल ते मे महिन्यात जुडवा २ च्या शूटिंगचा शेड्युल लंडनमध्ये असेल. विशेष म्हणजे या चित्रपटाची शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे. ‘जुडवा २’ हा चित्रपट याच वर्षी २९ सप्टेंबरला रिलीज करण्याचे निर्मात्यांनी ठरविले आहे. 

Web Title: 'Jubva 2' shooting starts going on; Release date is also scheduled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.