जोनिता गांधीने चाहत्यांना दिला अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’ प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 19:13 IST2017-02-10T13:43:01+5:302017-02-10T19:13:01+5:30
दंगलमधील ‘गिलहरीया’, ढिशूम मधील ‘सौ तरह के’ किंवा ऐ दिल है मुश्किल मधील ‘ब्रेक अप साँग’ असो आपल्या आवाजाने ...
.jpg)
जोनिता गांधीने चाहत्यांना दिला अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’ प्रस्ताव
द गलमधील ‘गिलहरीया’, ढिशूम मधील ‘सौ तरह के’ किंवा ऐ दिल है मुश्किल मधील ‘ब्रेक अप साँग’ असो आपल्या आवाजाने चाहत्यांच्या मनात खास जागा निर्माण करणारी गायिका जोनिता गांधीने आपल्या चाहत्यांना खास व्हॅलेंटाईन डेचा प्रस्ताव दिला आहे. अर्थातच हा काहीतरी खास आणि आगळा वेगळा असेल यात शंकाच नाही.
प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे या दिवशी काही खास केले नाही तर या दिवसाचे महत्त्व काय कामाचे! हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत असतात. मात्र काहीच्या नशीबी आनंद येईल असे नाहीच. मात्र अशा वेळी निराश होणाºयासाठी गायिका जोनिता गांधी आनंदाचा क्षण घेऊन येणार आहे. फास्ट लव्हच्या या युगात जोनिताने गायलेले द ब्रेक अप साँग सर्वांनाच आवडले होते. या गाण्यातून अत्यंत हलक्या फुलक्या ढंगात हृदयावर झालेला आघात विसरण्याचा मार्ग सांगण्यात आला होता.
![]()
यू ट्युब आर्टिस्ट ते ब्लॉकबस्टर गायिका म्हणून आपली ओळख मिळविणारी जोनिता गांधी हिने आपल्या चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे साजारा करण्याचे आमंत्रण देत आहे. जोनिता गांधीच्या अधिकृत यू-ट्युब चॅनलवर प्रसारित केल्या जाणाºया एका खास व्हिडीओमध्ये दिसण्याचा तिच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. यासाठी केवळ तिच्या चाहत्यांना ब्रेक अप साँग आपल्या पद्धतीने गाऊन पाठवायचे आहे. या गाण्याला ते ओरीजनल पद्धतीने गाऊ शकतात किंवा काही ट्विस्ट देऊन रेकॉर्ड करू शकतात. यासाठी केवळ एकच अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे सर्व प्रकारात मूळ धून व लय कायम राखायची आहे.
चाहत्यांच्या आवाजात रिकॉर्ड केलेल्या गाण्यांपैकी सर्वश्रेष्ठ व्हिडीओंना मॅशअप करून जोनिताच्या यू-ट्युब चॅनलवर दाखविण्यात येणार आहे. आपल्या या उपक्रमाबद्दल जोनिता म्हणाली, माझे हे गाणे जेव्हा रिलीज झाले त्यावेळी अनेकांनी याचा डबस्मॅश केलेला मी पाहिला आहे. मला विश्वास आहे की अनेक लोक यात सहभागी होतील. मी लोकांची प्रतिभा व त्यांचे गाणे ऐकण्यासा उत्सुक आहे.