थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'जॉली एलएलबी ३', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:01 IST2025-09-29T19:01:15+5:302025-09-29T19:01:35+5:30
अर्शद वारसी आणि अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी ३' थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार?

थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'जॉली एलएलबी ३', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
Jolly LLB 3 OTT Release: अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची जुगलबंदी असलेला 'जॉली एलएलबी ३' हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. कोर्टरूम ड्रामा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, अनेक चाहते आता त्याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सहसा थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या आठ आठवड्यांनंतरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित होतो. 'ईटी' (ET) मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 'जॉली एलएलबी ३' चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीज तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
'जॉली एलएलबी ३' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, याबद्दलही सस्पेंस आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix) किंवा जिओ सिनेमा (JioCinema) यापैकी एका प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 'जॉली एलएलबी' आणि जॉली एलएलबी २' हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. हे दोन्ही चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) वर पाहू शकता.
'जॉली एलएलबी ३' कसा आहे?
'जॉली एलएलबी ३' हा फक्त एक कॉमेडी सिनेमा नसून त्यातून एका महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य केलं गेलं आहे. सोशल मीडियावर सिनेमाचं प्रचंड कौतुक होत आहे. दरम्यान, जॉली एलएलबी ३ सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. या सिनेमात अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला, गजराज राव, अमृता राव, सीमा बिस्वास, हुमा कुरैशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.