Jolly LLB 2 trailer : ‘जॉली एलएलबी २’ चा दुसरा ट्रेलर आला!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 11:57 IST2017-01-24T06:21:10+5:302017-01-24T11:57:57+5:30

‘बॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी २’ चा दुसरा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या चित्रपटाचा ट्रेलर ...

Jolly LLB 2 trailer: 'Jolly LLB 2' got another trailer !!! | Jolly LLB 2 trailer : ‘जॉली एलएलबी २’ चा दुसरा ट्रेलर आला!!!

Jolly LLB 2 trailer : ‘जॉली एलएलबी २’ चा दुसरा ट्रेलर आला!!!

ॉलिवूडचा खिलाडी’ अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी २’ चा दुसरा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही प्रमोशनल व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अक्षय कुमारने हा ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या ट्रेलरमध्येही ‘जॉली’च्या नजरेतून न्यायसंस्थेचे दर्शन घडत आहे.

ALSO READ : ​ OMG !! अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी2’ विरूद्ध वकील गेला कोर्टात!

कठीण केसमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करणारा ‘जॉली’ आणि त्याच्या वाटेमध्ये अडथळा बनून येणारे काही लोक यावर हा ट्रेलर भाष्य करतो. ‘आय विल सी यु इन कोर्ट..’ ही ओळ या ट्रेलरमध्ये अनेकांचेच लक्ष वेधत आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेते अन्नू कपूर आणि अक्षय कुमारच्या प्रभावी अभिनयाची झलक पाहायला मिळतेय. त्यामुळे एका वकिलाच्या मार्गात कोणताही केस लढवताना अगदी वाईट परिस्थितीही उद्भवू शकते याचा अंदाज हा ट्रेलर पाहिल्यावर येत आहे. ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता अक्षय कुमार शक्य त्या सर्व परीने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये त्याचे योगदान देत आहे. चित्रपटांच्या चित्रिकरणासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असणारा अक्षय कुमार त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही चित्रपटासंबंधीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

ALSO READ : ​‘या’ चित्रपटाने निर्माण केले बॉलिवूडमध्ये दोन नवे ‘शत्रू’?

दरम्यान, सुभाष कपूर दिग्दर्शित हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा हा आगामी चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अक्षय कुमार, हुमा कुरेशी आणि अन्नू कपूर यात मुख्य भूमिका साकारतील. त्यामुळे येत्या काळात अक्षयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होतो का? पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

 

Web Title: Jolly LLB 2 trailer: 'Jolly LLB 2' got another trailer !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.