​जॉनी लिव्हरला १०० रुपयांची नोट वाटत होती एक लाखासारखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 10:18 IST2016-12-21T21:03:21+5:302016-12-22T10:18:18+5:30

Johny lever happy when he get 100 Rs Note; नोटबंदीनंतर १०० रुपयांची नोट पाहिल्यावर मला प्रत्येक नोट एक लाख रुपयांसारखी वाटत होती असे जॉनी लिव्हर म्हणालाय. याकाळात माझे चांगलेच वांदे झाले होते असे तो म्हणतोय खरा पण त्याने नोटबंदीचे समर्थनही केले आहे.

Johnny Liver had a note worth 100 rupees! | ​जॉनी लिव्हरला १०० रुपयांची नोट वाटत होती एक लाखासारखी!

​जॉनी लिव्हरला १०० रुपयांची नोट वाटत होती एक लाखासारखी!

ong>नोटबंदी नंतर जॉनी लिव्हरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो १०० रुपयांच्या नोटा पाहून नाचताना दिसतो आहे. आता त्याने या व्हिडिओशी नाते जोडले गेले असल्याचे सांगितले आहे. नोटबंदीनंतर १०० रुपयांची नोट पाहिल्यावर मला प्रत्येक नोट एक लाख रुपयांसारखी वाटत होती असे जॉनी लिव्हर म्हणालाय. याकाळात माझे चांगलेच वांदे झाले होते असे तो म्हणतोय खरा पण त्याने नोटबंदीचे समर्थनही केले आहे. 

एका संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार जॉनीभाईची नोटबंदीच्या काळात चांगलीच फजिती झाली होती असे वृत्त दिले आहे. ‘इनाडू वृत्तसंस्थे’ला दिलेल्या मुलाखतीनुसार, माझा एक कार्यक्रम १३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. लोक या कार्यक्रमाची तिकिटे खरेदी करण्यासाठी जुण्या ५०० च्या नोटा घेऊन आले होते. आयोजकांनी या नोटा घेण्यास नकार दिला. मी आयोजकांना जुण्या नोटा स्वीकारा असे सांगितले. मात्र शो संपल्यावर माझ्या जवळच सुटे पैसे नसल्याने माझी पंचाईत झाली. मी आयोजकांना १०० च्या नोटांमध्ये दहा हजारांची मागणी केली. त्यांनी ज्यावेळी मला १०० रुपयांचा बंडल दिला त्यावेळी मला ते दहा हजारातील प्रत्येक नोट एक लाख रुपयांसारखी वाटत होती, असे त्याने सांगितले. 



जॉनीने विनोदाने माझ्याजवळ काळे धन नसल्याचे सांगितले. मी बँकेच्या रांगेत लागून पैसे काढले आहेत. मात्र काही ठिकाणी मलाही अडचणी आल्या. काही ठिकाणी कार्ड स्वाईप करून पैसे काढले. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून बँकांसमोरिल गर्दी कमी होऊ लागली आहे.  आमच्या क्षेत्रात आधीपासूनच चेक पेमेंट होत असल्याने माझ्याकडे काळे धन नाही, यामुळे मला भिती वाटत नाही असे सांगितले. 

Web Title: Johnny Liver had a note worth 100 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.