"कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा आणि भारतीने माझं रॅगिंग केलं", जॉनी लिव्हरच्या लेकीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 19:05 IST2024-01-25T19:05:05+5:302024-01-25T19:05:37+5:30

भारती आणि कृष्णाने कॉमेडी शोमध्ये केलेलं जेमीचं रॅगिंग, म्हणाली - "त्यांनी माझी बॅग घेतली अन्..."

johnny lever daughter jamie lever says krushna abhishek and bharti singh ragging me in comedy circus show | "कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा आणि भारतीने माझं रॅगिंग केलं", जॉनी लिव्हरच्या लेकीचा मोठा खुलासा

"कॉमेडी सर्कसमध्ये कृष्णा आणि भारतीने माझं रॅगिंग केलं", जॉनी लिव्हरच्या लेकीचा मोठा खुलासा

बॉलिवूडचा लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर यांच्या कॉमेडीला तोड नाही. अफलातून विनोदबुद्धीच्या जोरावर त्यांनी आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकतच जॉनी लिव्हरची लेक जेमी लिव्हरनेही कलाविश्वात पाऊल ठेवलं. जेमीदेखील वडिलांप्रमाणेच कॉमेडी जॉनरमध्ये करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेमीने कलाविश्वातील तिचा अनुभव सांगितला. 

जेमीने सोनी टीव्हीवरील 'कॉमेडी सर्कस'मधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. या कॉमेडी शोमधून तिला पहिला ब्रेक मिळाला होता. याचा अनुभव जेमीने एका मुलाखतीत सांगितला. ती म्हणाली, "या शोमध्ये मी जाऊ नये अशी वडिलांची इच्छा होती. हा शो कसा असेल, याबद्दल मला माहीत नाही. अशी त्यांची प्रतिक्रिया होती." जेमीने ऑडिशनवेळी ती जॉनी लिव्हर यांची मुलगी असल्याचं लपवलं होतं. जेमी जे या नावाने तिने ऑडिशन दिली होती. ऑडिशनमधून निवड झाल्यानंतर तिची इतर कास्ट आणि क्रूबरोबर भेट झाली. 

"मी सुदेश, कृष्णा आणि भारती यांना कास्ट आणि क्रूच्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा भेटले. त्यांनी माझं रॅगिंग करायला सुरुवात केली. त्यांनी माझी बॅग घेतली आणि माझे वडील काय करतात? असं मला विचारलं. जेव्हा मी माझे वडील कोण आहेत हे सांगितलं. तेव्हा सुदेशजी म्हणाले की अरे बेटा तू आम्हाला मुलीसारखीच आहेस. मी त्यांच्या कुटुंबातील एक भाग आहे आणि त्यांनी माझी काळजी घ्यायला हवी, असं त्यांना नंतर वाटलं," असंही पुढे जेमीने सांगितलं.  

पुढे जेमी म्हणाली, "जेव्हा निर्मात्यांना कळलं की मी जॉनी लिव्हर यांची मुलगी आहे. तेव्हा त्यांनी प्रत्येक एपिसोडमध्ये मला जॉनी लिव्हर यांचं काहीतरी असलं पाहिजे, असं सांगितलं होतं. जॉनी लिव्हरच्या मुलीला आमच्या शोमधून लॉन्च करत आहोत, असं त्यांना दाखवायचं होतं."  

Web Title: johnny lever daughter jamie lever says krushna abhishek and bharti singh ragging me in comedy circus show