दिलदार जॉन अब्राहमचा स्वॅगच निराळा! चाहत्याला दिलं एक महागडं गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 09:56 AM2024-05-03T09:56:10+5:302024-05-03T09:57:08+5:30

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.

John Abraham Gift To Fan Pair Of Riding Shoes Worth Rs 22500 | दिलदार जॉन अब्राहमचा स्वॅगच निराळा! चाहत्याला दिलं एक महागडं गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल

दिलदार जॉन अब्राहमचा स्वॅगच निराळा! चाहत्याला दिलं एक महागडं गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. तो नेहमीच आपल्या वागण्यातून चाहत्यांची मनं जिंकतो. आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जॉन अब्राहम खास वेळ काढतो. परंतु, यावेळेस जॉन अब्राहमने असं काहीतरी केलंय, ज्यामुळे चाहते त्याच्यावर अक्षरशः फिदा झाले आहेत. जॉन अब्राहमने त्याच्या चाहत्याचा वाढदिवस अगदी खास केला आहे, चाहत्यांला त्यानं एक अनमोल अशी भेटवस्तू दिली आहे.

जॉन अब्राहमचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या चाहत्याला भेटवस्तू देताना पाहायला मिळतोय.  चाहत्याच्या वाढदिवसानिमित्त जॉन अब्राहमने त्याला बाइकिंग शूजची एक जोड भेट दिली आहे. व्हिडीओमध्ये जॉन आपल्या चाहत्याला शूज घालताना मदत करत असल्याचं दिसून येत आहे. जॉनने आपल्या हातांनी चाहत्याच्या शूजची लेस बांधली आहे.

जॉनच्या या चाहत्याचं नाव अक्षय केदारी असं आहे. त्यानं Twitter(x) जॉनसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. जॉनने त्याला वाढदिवसाची भेट म्हणून २२ हजारांहून अधिक किमतीचे शूज दिले आहेत. जॉनसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत अक्षयने ट्विट केले की, 'जॉन सरांनी मला माझ्या वाढदिवशी हे प्रीमियम इटालियन राइडिंग शूज गिफ्ट केले आहेत... ₹२२.५ हजार किमतीचे... धन्यवाद सर'. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी जॉनचं तोंड भरून कौतुक करत आहेत.

जॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच वेदा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निखिल अडवाणी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा १२ जुलै २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. जॉनचे चाहते पुन्हा एकदा त्याला अ‍ॅक्शन अंदाजात बघायला कमालीचे उत्सुक आहेत. जॉनने याआधी 'सत्यमेव जयते', 'सत्यमेव जयते 2', 'फोर्स', 'फोर्स 2', 'पठाण' अशा सिनेमांमधून दमदार अ‍ॅक्शन भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: John Abraham Gift To Fan Pair Of Riding Shoes Worth Rs 22500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.