प्रियंकाचा दीर जो जोनसच्या बॅचलर्स पार्टीत घडलं असं काही, ज्यामुळे तीन वेळा आले पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 12:51 IST2019-06-15T12:51:12+5:302019-06-15T12:51:48+5:30
प्रियंका चोप्राचा दीर व निक जोनासचा मोठा भाऊ जो जोनसने काही दिवसांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्री सोफी टर्नरसोबत लग्न केलं.

प्रियंकाचा दीर जो जोनसच्या बॅचलर्स पार्टीत घडलं असं काही, ज्यामुळे तीन वेळा आले पोलीस
प्रियंका चोप्राचा दीर व निक जोनासचा मोठा भाऊ जो जोनसने काही दिवसांपूर्वी गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्री सोफी टर्नरसोबत लग्न केलं. १ मे, २०१९ ला दोघांनी लॉस वेगासमध्ये लग्न करून सर्वांना चकीत केलं होतं.लग्नापूर्वी जो जोनसच्या बॅचलर्स पार्टीत असे काही घडले की तिथे तीन वेळा पोलिसांना यावं लागलं होतं.
नुकताच जोनस ब्रदर्स एका चॅट शोमध्ये गेले होते. तिथे त्यांच्यासोबत 'Know Your Bro' हा गेम खेळले. यावेळी त्यांना विचारलं गेलं की जो जोनसच्या बॅचलर्स पार्टीत सर्वात वाईल्ड गोष्ट काय होती? या प्रश्नाच्या उत्तरात निक जोनस म्हणाला की, जोची बॅचरल पार्टी स्पेनच्या आयलंडवर आयोजित केली होती. या पार्टीत अशा बऱ्याच विचित्र गोष्टी घडल्या ज्यामुळे तिथल्या होस्टने तीन वेळा पोलिसांना फोन केला आणि तिथे तीन वेळा पोलीस आले होते.
पुढे निकने सांगितले की, पार्टीमध्ये आपण सगळे इतके तल्लीन झालो होतो की जो ने आपला शर्टदेखील फाडून टाकला होता. इतकेच नाही तर आपल्या मित्रांचादेखील शर्ट फाडून टाकला होता. त्यानंतर तो विचित्र वागू लागला होता.
जो जोनस व सोफी टर्नरने आपल्या लग्नाबद्दल सांगितलं नव्हतं. त्यांच्या लग्नाबद्दल तेव्हा समजलं जेव्हा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर जो व सोफीने लग्न केल्याचं मीडियासमोर कबूल केले होते.