Jhund: नागराज मंजुळे भावा... सिद्धार्थ जाधवने तीनच शब्दात सांगितला 'झुंड' सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:57 IST2022-03-05T16:56:19+5:302022-03-05T16:57:41+5:30
Jhund: अभिनेता जितेन्द्र जोशी ( Jitendra Joshi) याने तर या चित्रपटाच्या निमित्ताने नागराजवर कौतुकाचा वर्षाव केला

Jhund: नागराज मंजुळे भावा... सिद्धार्थ जाधवने तीनच शब्दात सांगितला 'झुंड' सिनेमा
मुंबई - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित ‘झुंड’ प्रदर्शित झालाय आणि सध्या सर्वत्र या आणि याच चित्रपटाची चर्चा आहे. अगदी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान पासून साऊथचा सुपरस्टार धनुषपर्यंत सगळ्यांनी ‘झुंड’ (Jhund) बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे. मराठी अभिनेता सुबोध भावे यानेही ‘झुंड’आणि नागराज यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. तर, मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही नागराजचं तोंड भरुन कौतूक केलंय.
अभिनेता जितेन्द्र जोशी ( Jitendra Joshi) याने तर या चित्रपटाच्या निमित्ताने नागराजवर कौतुकाचा वर्षाव केला. जितेन्द्रने नागराज यांच्यासोबतीने इन्स्टावर लाईव्ह येत, ‘झुंड’सारखा सिनेमा फक्त नागराजचं करू शकतो. तू महानायक आणि महामानवाला एका फ्रेममध्ये आणलंस...,’ अशा शब्दांत त्याने नागराजचं कौतुक केलं. तर, दुसरीकडे अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही तुम्ही आमचं अस्तित्व नाकारुच शकत नाहीत, असे म्हणत नागराज मंजुळे भावा... अप्रतिम असे म्हटले.
"तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही."
नागराज मंजुळे भावा..."अप्रतिम" हा शब्द फक्त नावाला आहे.. त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर "झुंड" पाहयलाच हवा. जे "जगणं" आहे तेच नागराज ने "खरंखरं" मांडलय. "माणसाच्या माणूसकीचा प्रवास म्हणजे "झुंड" असे म्हणत सिद्थार्थने केवळ तीनच शब्दात सिनेमा सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्यासोबतच, नागराज मंजुळेंचं तोंड भरुन कौतुकही सिद्धार्थने केलं आहे.
स्वप्न प्रत्येकाची असतात. पण ती पूर्ण करण्याची धमक "झुंड" मध्ये होती, आहे आणि कायम राहणार. हे तू पुन्हा एकदा सिध्द केलस. अभिमान वाटतो तुझा... "अपून की बस्ती गटर मे है... पर तुम्हारे मन मे गंद है"....
या ओळी मनातून जातच नाहीत, असे म्हणत सिद्धार्तने नागराजचे कौतूक केलंय. त्यासोबतच, अजय अतुल दादा... l love you..forever, असे म्हणत त्यांच्या गाण्यांनाही दाद दिली. तर, कलाकारांच्या कामाबद्दल मी काय बोलणार.. "बच्चों से लेकर बच्चन तक".... सगळेच वरचा class...
जे जगणं आहे तेच नागराज ने खरंखरं मांडलय.... माणसाच्या माणूसकीचा प्रवास... झुंड... नक्की बघा नाही.. पहायलाच हवा... असे आवाहनही सिद्धार्थने चाहत्यांना केलं आहे.
काय म्हणाला होता जितेन्द्र जोशी...
‘झुंड’ सारखा सिनेमा बनवला याबद्दल एक मित्र म्हणून, या समाजाचा एक नागरिक म्हणून मी तुझे आभार मानतो. तू अशा पद्धतीचा सिनेमा काढून तू माझ्यावर, माझ्या पोरीवर, समाजावर उपकार करतोय. तुला कौतुक आवडत नाही. पण मी आज बोलणार आहे. तीन दिवस झालेत सिनेमा बघून, पण हा सिनेमा मनातून हलतचं नाहीये रे...आमिर कौतुक करतोय, धनुष करतोय. त्यांना कौतुक करावंच लागेल. ही कलेची जबरदस्ती आहे.
तू बच्चन साहेबांना ‘बच्चनगिरी’ करूच दिलीस नाहीस... खरी बच्चनगिरी तर तुझ्या पोरांनी केली. ही कमाल फक्त नागराजचं करू शकतो.हे फक्त तुलाच जमतं राव.... नागराज तू असाच राहा, असेच जगणं दाखवणारे सिनेमे बनव...., तू सगळंच कर....अभिनय कर, सिनेमे बनव...अशा शब्दांत जितेन्द्र नागराज यांच्याबद्दल भरभरून बोलला.