जान्हवी कपूर व ईशान खट्टरची छोट्या पडद्यावर 'धडक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 08:00 IST2018-09-17T13:05:47+5:302018-09-18T08:00:00+5:30
मराठी सुपरहिट चित्रपट 'सैराट'चा हिंदी चित्रपट 'धडक' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून जान्हवी कपूर व ईशान खट्टर ही नवीन जोडी बॉलिवूडला मिळाली.

जान्हवी कपूर व ईशान खट्टरची छोट्या पडद्यावर 'धडक'
मराठी सुपरहिट चित्रपट 'सैराट'चा हिंदी चित्रपट 'धडक' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून जान्हवी कपूर व ईशान खट्टर ही नवीन जोडी बॉलिवूडला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. शशांक खेतान दिग्दर्शित 'धडक' चित्रपट आता लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणारा 'धडक' २० जुलै प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि मराठी प्रमाणे हिंदी रिमेकही लोकप्रिय ठरला. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांमध्ये जगभरामध्ये १०० कोटींची कमाई केल्याचे समजते आहे. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबरला छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे.
'धडक' चित्रपट ३० सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता झी सिनेमा या वाहिनीवर प्रसारित होणार असल्याची माहिती चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे. तसेच हा चित्रपट नक्की पहा, असे आवाहनही करणने ट्विटमध्ये केले आहे.
DHADAK❤️❤️❤️ @ShashankKhaitan#Janhvi#Ishaanhttps://t.co/YERepgSe1L
— Karan Johar (@karanjohar) September 17, 2018
'धडक' चित्रपटामुळे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी लोकप्रिय झाली आहे. या सिनेमानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या आहेत. आता तिची करण जोहरचा आगामी चित्रपट 'तख्त'मध्ये देखील वर्णी लागल्याचे समजते आहे.
श्रीदेवी यांनी अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य केले आहे. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची मुलगी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूड गाजवेल अशी कपूर कुटुंबियांना खात्री आहे.