झोया अख्तरच्या चित्रपटात जेनिफर??
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 20:34 IST2016-06-28T15:04:01+5:302016-06-28T20:34:59+5:30
ब्युटिफुल जेनिफर विन्गेट हिच्याकडे एक गोड बातमी आहे...थांबा..थांबा..तसली गोड बातमी नाही. जेनिफरने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटासोबत जेनिफरने एक गर्भित मॅसेजही दिला आहे.

झोया अख्तरच्या चित्रपटात जेनिफर??
ब युटिफुल जेनिफर विन्गेट हिच्याकडे एक गोड बातमी आहे...थांबा..थांबा..तसली गोड बातमी नाही. जेनिफरने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटासोबत जेनिफरने एक गर्भित मॅसेजही दिला आहे. माझे स्वप्न सत्यात उतरले...तुम्ही ऐकले?? असा काहीसा मॅसेज तिने दिला.. आता या मॅसेजचा अर्थ काढायचा तर आम्ही ऐकतोय ती बातमी तुम्हाला द्यायला हवीच. झोया अख्तरच्या चित्रपटात जेनिफर दिसणार असल्याची बातमी आहे. त्याचमुळे झोयाचा चित्रपट खरोखरीच जेनिफरच्या हाती लागला की काय, असा प्रश्न तिचा मॅसेज वाचल्यानंतर आम्हाला पडलाय. या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असावे, ही जेनिफरप्रमाणेच आमच्यासाठीही आनंदाची व गोड बातमीच आहे..बॉलिवूडमध्ये पाय रोवू इच्छिणाºया जेनिफरसाठी यापेक्षा मोठी संधी ती कुठली असू शकते.. झोयाच्या या चित्रपटात रणवीर सिह आणि फवाद खान असणार ही सुद्धा चर्चा आहे. असे झालेच तर जेनिफरची लॉटरीच लागली असे समजायला हरकत नाही!!