सतत पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन यांनी पहिल्यांदाच दिली अशी रिअ‍ॅक्शन, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:50 IST2023-03-03T13:50:00+5:302023-03-03T13:50:39+5:30

Jaya Bachchan : जया बच्चन यांना पापाराझी आवडत नाहीत. जेव्हा जेव्हा पापाराझी त्यांच्या मागे किंवा त्यांच्या घराच्या आजूबाजूला दिसले, तेव्हा अभिनेत्री अनेकदा त्यांच्यावर रागावताना दिसल्या.

Jaya Bachchan, who is constantly lashing out at the paparazzi, gave her first reaction, netkari said... | सतत पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन यांनी पहिल्यांदाच दिली अशी रिअ‍ॅक्शन, नेटकरी म्हणाले...

सतत पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन यांनी पहिल्यांदाच दिली अशी रिअ‍ॅक्शन, नेटकरी म्हणाले...

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या हिंदी चित्रपटसृष्टीतील सशक्त अभिनेत्री तसेच राजकारणी आहेत. सभागृहात विरोधी पक्षाकडून वारंवार मुद्दे मांडण्यासाठी त्या ओळखल्या जातात. जया बच्चन यांना पापाराझी आवडत नाहीत. जेव्हा जेव्हा पापाराझी त्यांच्या मागे किंवा त्यांच्या घराच्या आजूबाजूला दिसले, तेव्हा अभिनेत्री अनेकदा त्यांच्यावर रागावताना दिसल्या. अनेकवेळा त्यांनी पापाराझींना फटकारले आहे, ज्यासाठी जया बच्चन प्रत्येक वेळी ट्रोल झाल्या आहेत. मात्र यावेळी जया बच्चन चांगल्या मूडमध्ये दिसत आहेत.

अलीकडेच फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी मुंबईत त्यांचा आगामी फॅशन चित्रपट मेरा नूर है मशहूरचा भव्य लॉन्च कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी पोहोचले होते. राधिका मर्चंट, नेहा धुपिया, सोनाली बेंद्रे, हुमा कुरेशी, नताशा, बाबिल, उर्फी जावेद, अर्सलान गोनी, सुझैन खान, श्वेता बच्चन नंदा तसेच जया बच्चन या कार्यक्रमात दिसल्या. यावेळी जया बच्चन चांगल्या मूडमध्ये दिसल्या. त्यांनी पापाराझींसोबत फोटोसाठी पोज दिली आणि त्यांच्याशी बोलतानाही दिसल्या.

यादरम्यान त्यांनी मीडियासमोर पोझ दिली आणि जेव्हा त्या निघू लागल्या तेव्हा पापाराझींनी त्यांना हाक मारल्यानंतर जया बच्चन यांनी मागे वळून प्रेमाने स्माईल दिली. यानंतर त्या पापाराझींकडे जाऊन त्यांच्याशी बोलतानाही दिसल्या. यादरम्यान जया बच्चन यांनी पापाराझींसोबत फोटो क्लिक केले ज्यांना ती आधीच ओळखत होती आणि म्हणाल्या की, पाहा किती स्माईल करतेय मी.

जया बच्चन यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. यावर काही लोक कमेंटही करत आहेत. एका युजरने लिहिले की, काय बघितलंस भाऊ, मॅडमचं समुपदेशन झाले आहे. दुसर्‍याने म्हटले की, आजचा दिवस मीडिया लोकांसाठी चांगला आहे. आणखी एका यूजरने असेही म्हटले की, लोक त्यांची खिल्ली उडवू लागले आहेत, त्यामुळेच आता त्यांच्यात सुधारणा झाली आहे. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले- की, आज काकूंचा मूड चांगला आहे. याआधी जया बच्चन यांना जेव्हा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट केले गेले तेव्हा त्या पापाराझींवर रागावताना दिसल्या. यापूर्वी असे व्हिडीओ समोर आले होते ज्यात अभिनेत्री पापाराझींवर चिडताना दिसल्या होत्या.
 

Web Title: Jaya Bachchan, who is constantly lashing out at the paparazzi, gave her first reaction, netkari said...