अर्शद वारसीला एअरपोर्टवर चड्डी बनियानवर पाहून संतापल्या होत्या जया बच्चन, अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 09:57 IST2024-08-09T09:53:57+5:302024-08-09T09:57:12+5:30

Jaya Bachchan-Arshad Warsi : अर्शदचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत खास नाते आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की, एकदा अर्शद वारसीवर जया बच्चन खूप संतापल्या होत्या.

Jaya Bachchan was furious after seeing Arshad Warsi in shorts and vest at the airport, reveals actor | अर्शद वारसीला एअरपोर्टवर चड्डी बनियानवर पाहून संतापल्या होत्या जया बच्चन, अभिनेत्याचा खुलासा

अर्शद वारसीला एअरपोर्टवर चड्डी बनियानवर पाहून संतापल्या होत्या जया बच्चन, अभिनेत्याचा खुलासा

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) अभिनयासोबतच नृत्यातही अप्रतिम आहे. त्याचे टॅलेंट चाहत्यांना खूप आवडते. मुन्नाभाई एमबीबीएससह अनेक चित्रपटांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. अर्शदचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत खास नाते आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की, एकदा अर्शद वारसीवरजया बच्चन (Jaya Bachchan) खूप संतापल्या होत्या. जया यांनी विमानतळावर सर्वांसमोर अर्शदला फटकारले होते आणि अभिनेत्याने अनेक वर्षांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

खरेतर अर्शद वारसीने नुकतेच समदीश भाटिया यांच्याशी खास बातचीत केली. यादरम्यान त्याने खुलासा केला की जया बच्चन यांनी त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे त्यांना दोनदा फटकारले होते. तो म्हणाला, 'काही वर्षांपूर्वी मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो तेव्हा मला इथल्या पद्धती माहित नव्हत्या. तेरे मेरे सपने या पहिल्या चित्रपटासाठी मी हैदराबादला गेलो होतो. त्यावेळी मी फक्त चड्डी आणि बनियान घालून तिथे पोहोचलो होतो. मी देखील एक डान्सर आहे आणि तो अनेकदा डान्सर सारखे कपडे घालतात. त्यानंतर मला जया बच्चन यांचा एक मेसेज आला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की कृपया मिस्टर वारसी यांना व्यवस्थित कपडे घालायला सांगा.

अर्शद वारसीने दाखवला बॉलिवूडचा खरा चेहरा 
अर्शदने आणखी एका घटनेचा उल्लेख केला, जिथे त्याने जया बच्चन यांच्यासमोर सिनेमाला बकवास म्हटले होते. अर्शदने खुलासा केला की, जया बच्चन यांनी त्यांना एका चित्रपटाबद्दल विचारण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर त्यांनी जया बच्चन यांना स्पष्टपणे सांगितले की, त्यांना चित्रपट चांगला वाटला नाही. हे ऐकून अभिनेत्रीने त्याला बाजूला घेतले आणि म्हणाल्या की, 'तुझं मत तुझ्याकडेच ठेव.' शेवटी जया बच्चन म्हणाल्या की बॉलिवूड इंडस्ट्रीत 'येस मॅम'वाली संस्कृती आहे. इथे सत्याला किंमत नाही. इथे चित्रपट कितीही वाईट वाटला तरी त्याची स्तुतीही करावीच लागते.
 

Web Title: Jaya Bachchan was furious after seeing Arshad Warsi in shorts and vest at the airport, reveals actor