पापाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर हसताना दिसल्या, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:20 IST2025-09-30T16:19:34+5:302025-09-30T16:20:51+5:30
अनेकदा जया बच्चन पापाराझींवर ओरडताना दिसतात. त्यांच्या स्वभावामुळे अनेकदा अभिनेत्रीला ट्रोलही करण्यात आलं आहे. पण, नेहमी पापाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन यांचं एक वेगळंच रुप नवरात्रीत पाहायला मिळालं आहे.

पापाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर हसताना दिसल्या, व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले...
बॉलिवूडमधल्या दिग्गज अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या स्वभावामुळे कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेकदा जया बच्चन पापाराझींवर ओरडताना दिसतात. त्यांच्या स्वभावामुळे अनेकदा अभिनेत्रीला ट्रोलही करण्यात आलं आहे. पण, नेहमी पापाराझींवर चिडणाऱ्या जया बच्चन यांचं एक वेगळंच रुप नवरात्रीत पाहायला मिळालं आहे.
जया बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन चक्क हसताना दिसत आहे. जया बच्चन यांनी नवरात्रीनिमित्त काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या देवीच्या पंडालमध्ये हजेरी लावली. लाल रंगाची साजी नेसून पारंपरिक लूकमध्ये जया बच्चन देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या. तिथे पापाराझींच्या कॅमेऱ्यात जया बच्चन कैद झाल्या. विशेष म्हणजे यावेळेस पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना त्या हसताना दिसल्या. त्यांच्यासोबत व्हिडीओत काजोलही दिसत आहे.
वुम्पला या पापाराझी पेजवरुन जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. "जयाजी किती गोड दिसत आहात", "जया बच्चन यांना खरंच हसता येतं", "या फक्त काजोलसोबत हसत असतील", "त्या चांगल्या आहेत. त्यांचा मूड चांगला असतो तेव्हा त्या छान दिसतात", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.