बॉलिवूड गाजवणारा 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक ३९ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीसह केलं खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:19 IST2026-04-04T12:18:43+5:302026-04-04T12:19:48+5:30

दिग्दर्शकाने पत्नीसह ट्रेडिशनल अंदाजात केलेलं खास मॅटर्निटी फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे

jawan movie director atlee maternity photoshoot with wife priya atlee | बॉलिवूड गाजवणारा 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक ३९ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीसह केलं खास फोटोशूट

बॉलिवूड गाजवणारा 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक ३९ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीसह केलं खास फोटोशूट

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच 'जवान' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली कुमार (Atlee) सध्या एका अतिशय आनंदाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. ॲटली आणि त्यांची पत्नी प्रिया ॲटली यांच्या आयुष्यात दुसऱ्यांदा चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. या खास निमित्ताने ॲटलीने आपल्या पत्नीसोबत सुंदर रोमँटिक मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे, जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रिया ॲटली आपला बेबी बंप अतिशय आत्मविश्वासाने आणि आनंदाने फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोशूटमध्ये ॲटली आणि प्रिया यांच्यातील केमिस्ट्री आणि एकमेकांबद्दलचे प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. दोघांनीही पारंपरिक कपडे परिधान केले आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "आमच्या आयुष्यातील हा एक अतिशय भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे," अशा आशयाचे कॅप्शन देत ॲटलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


 हे फोटो पोस्ट होताच मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार आणि चाहत्यांनी या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक बड्या स्टार्सनी या फोटोशूटचे कौतुक करत येणाऱ्या बाळासाठी आणि नव्या पालकांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी "सर्वात गोंडस जोडी" आणि "आनंदी कुटुंब" अशा कमेंट्स करत फोटोंना पसंती दर्शवली आहे. 

 ॲटली आणि प्रिया यांचे लग्न २०१४ मध्ये झाले असून, ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. २०२३ ला त्यांना मुलगा झाला. त्यांनी त्याचं नाव मीर असं ठेवलंय. आता तीन वर्षांनी ॲटली दुसऱ्या मुलाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे क्षण ते वारंवार चाहत्यांसोबत शेअर करत असतात. ॲटली सध्या त्यांच्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असले तरी, आपल्या पत्नीच्या आयुष्यातील या महत्वाच्या क्षणांसाठी तो वेळ काढत आहे.

Web Title : निर्देशक एटली कुमार और पत्नी दूसरी बार माता-पिता बनने वाले हैं, तस्वीरें साझा कीं।

Web Summary : निर्देशक एटली कुमार और उनकी पत्नी प्रिया दूसरी बार माता-पिता बनने वाले हैं। दंपति ने रोमांटिक मैटरनिटी फोटोशूट साझा किया, जिससे प्रशंसकों और हस्तियों में उत्साह है। उन्होंने 2014 में शादी की और 2023 में अपने पहले बच्चे का स्वागत किया।

Web Title : Director Atlee Kumar and wife expecting second child, shares photos.

Web Summary : Director Atlee Kumar and his wife, Priya, are expecting their second child. The couple shared romantic maternity photoshoot, generating excitement among fans and celebrities. They married in 2014 and welcomed their first child in 2023.