नव्या नंदासह लग्न करण्याची या अभिनेत्याची इच्छा, रिलेशनशिपला घेवून केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 16:22 IST2021-01-04T16:22:33+5:302021-01-04T16:22:44+5:30
नव्या काही वर्षांपूर्वी एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली होती. नव्या तर बिनधास्त होती. पण तिच्यासोबत असलेला मिस्ट्री बॉय मात्र मीडियाच्या कॅमे-यांसमोर आपला चेहरा लपवतांना दिसला होता. तेव्हापासून दोघांच्या अफेअरची चर्चा जोर धरत असते.

नव्या नंदासह लग्न करण्याची या अभिनेत्याची इच्छा, रिलेशनशिपला घेवून केला मोठा खुलासा
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेहमीच चर्चेत असतो. अभिषेक - ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या नेहमीच चर्चेत असतात. त्याचपाठोपाठ श्वेता बच्चन नंदा इंडस्ट्रीत काम करत नसली तरीही मोठ्या प्रमाणात तिची चर्चा होते.फक्त श्वेताच नाही बिग बींची नात नव्या नवेली नंदाही सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.
नव्या नंदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी कुटुंबियांसह आणि मित्रांसह एन्जॉय करतानाचे फोटोंमुळे चर्चेत असते.अलीकडेच तिने इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले आहे. तेव्हापासून तिची प्रत्येक अपडेटचा चाहते अंदाज लावतात. आजपर्यंत कधीही समोर न आलेले फोटोही तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरीसह तिचे अनेक फोटो आहेत. दोघांचेही एकत्र फिरतानाचे फोटो पाहून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे.
नव्या काही वर्षांपूर्वी एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली होती. नव्या तर बिनधास्त होती. पण तिच्यासोबत असलेला मिस्ट्री बॉय मात्र मीडियाच्या कॅमे-यांसमोर आपला चेहरा लपवतांना दिसला होता. तेव्हापासून दोघांच्या अफेअरची चर्चा जोर धरत असते.
नव्याबरोबरच्या नात्यातील चर्चेच्या दरम्यान मिजानने झूमला दिलेल्या मुलाखतीत यावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे. या मुलाखतीत मिझानला विचारले गेले होते की सारा अली खान, नव्या नवेली नंदा आणि अनन्या पांडे यांच्यापैकी लग्न करण्यासाठी कोणाला निवडशील ? मिझाननेही "मला नव्याबरोबर लग्न करायला आवडेल असे सांगितले.
यासह, त्याने नव्याबरोबरच्या मैत्रीबाबतही खुलासा केला आहे. मुलगा मुलगी या दोघांमध्ये केवळ बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड्सच्याच नजरेने आपण का पाहतो. त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते देखील असते, जर दोघे एकत्र फिरत असतील तर याचा अर्थ असा नाही की दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
आमच्या दोघांमध्ये केवळ मैत्री आहे. उगाच या नात्याला दुसरे काही नाव लावून अफवा पसरवू नये असेही त्याने सांगितले. मिझानने नव्या फक्त मैत्रिण असल्याचे म्हणत अफेअर्सच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.