​‘सुलतान’च्या निमित्ताने ‘जावईभेट’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 17:27 IST2016-07-12T11:57:06+5:302016-07-12T17:27:06+5:30

सलमान खानच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा जोरात आहे. यावेळी प्रकरण थोडे पुढे गेलेले दिसतेय. सलमान सध्या ‘सुलतान’च्या अफाट यशाची ...

'Javai Bheet' on the occasion of 'Sultan'? | ​‘सुलतान’च्या निमित्ताने ‘जावईभेट’?

​‘सुलतान’च्या निमित्ताने ‘जावईभेट’?

मान खानच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा जोरात आहे. यावेळी प्रकरण थोडे पुढे गेलेले दिसतेय. सलमान सध्या ‘सुलतान’च्या अफाट यशाची गोडी चाखतोय. समीक्षकांनी ‘सुलतान’ची भरभरून प्रशंसा केलीयं. सलमानची कथित गर्लफे्रन्ड यूलिया वंतूर ही सुद्धा ‘सुलतान’मधील सलमानची अ‍ॅक्टिंग पाहून भारावून गेली आहे. कदाचित यामुळे सलमानला कुटुंबीयांशी भेटवण्याची ही चांगली संधी आहे, असे यूलियाला वाटू लागले आहे. त्यामुळे यूलियाने सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर ‘सुलतान’च्या स्पेशल स्क्रीनिंगचा प्लॅन आखला आहे म्हणे. एका आॅनलाईन वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, यूलिया तिच्या कुटुंबासाठी पनवेल फार्महाऊसवर ‘सुलतान’ची स्पेशल स्क्रीनिंग होस्ट करणार आहे. यावेळी सलमान प्रथमच यूलियाच्या कुटुंबीयांना भेटणार. सलमान लवकरच कबीर खानच्या ‘ट्यूबलाईट’चे शूटींग सुरु करतो आहे. तत्पूर्वी सलमान यूलियाच्या कुटुंबीयांना भेटणार आहे. एकंदरच ‘सुलतान’च्या निमित्ताने सलमान यूूलियाच्या कुटुंबीयांना भेटणार आहे. आता यूलियाच्या कुटुंबीयांना ‘जावईबापू’ किती पसंत पडतात ते बघूच!

Web Title: 'Javai Bheet' on the occasion of 'Sultan'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.