जपानमधील फूड विक्रेता आहे बाहुबलीचा खूप मोठा फॅन, प्रभासला दिलं अनोखं गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:17 IST2019-11-14T19:17:23+5:302019-11-14T19:17:46+5:30
साऊथचा सुपरस्टार प्रभासचं जगभरात चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे आपल्याला पहायला मिळालं आहे.

जपानमधील फूड विक्रेता आहे बाहुबलीचा खूप मोठा फॅन, प्रभासला दिलं अनोखं गिफ्ट
साऊथचा सुपरस्टार प्रभासचं जगभरात चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे आपल्याला पहायला मिळालं आहे. त्यानंतर आता आणखीन एका चाहत्याची करामत पाहून सगळे थक्क झाले आहेत. हा चाहता जपानमधील असून तो प्रभासचा फोटो असलेल्या काचेच्या बाटल्यांमधून पदार्थ विकतो आहे.
जपानमधील प्रभासचा हा चाहता फूड विक्रेता असून त्याच्या फूड पॅकेजवर प्रभासचे फोटो पाहायला मिळत आहेत. जपानमध्येही आपले चाहते असल्याचं पाहून प्रभासही अवाक् झाला आहे. प्रभासनं या चाहत्याचे आभार मानले आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा 'बाहुबली' चित्रपटामुळे जगभरात लोकप्रिय झाला. प्रभासचा चाहतावर्ग केवळ दक्षिणेपुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण देशभरात आहे. इतकंच नाही तर दूरदेशी जपानमध्येही प्रभासचा मोठा चाहता वर्ग आहे. याची प्रचिती नुकतीच आली.
प्रभासचा 'साहो' चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक बजेट असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रभास लवकरच 'अमौर' चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.
आपल्या १४ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ १९-२० चित्रपट केले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो.
प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘3 इडियट्स’ 20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत.अख्ख जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख, सलमान आणि दीपिकाचा तो फॅन आहे. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे.