जान्हवी कपूरच्या आॅनस्क्रिन ‘मॉम’ला वाटते श्रीदेवीच्या दोन्ही मुलींची चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:25 IST2018-02-27T09:55:11+5:302018-02-27T15:25:11+5:30

श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. या चित्रपटात तिच्या आईची भूमिका साकारणाºया ...

Janshavi Kapoor's Anskrine 'Mom' thinks Sridevi's two daughters are worried! | जान्हवी कपूरच्या आॅनस्क्रिन ‘मॉम’ला वाटते श्रीदेवीच्या दोन्ही मुलींची चिंता!

जान्हवी कपूरच्या आॅनस्क्रिन ‘मॉम’ला वाटते श्रीदेवीच्या दोन्ही मुलींची चिंता!

रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. या चित्रपटात तिच्या आईची भूमिका साकारणाºया अभिनेत्री शालिनी कपूरला सध्या जान्हवीची प्रचंड चिंता वाटत आहे. शालिनीने म्हटले की, माझ्या आयडॉल असलेल्या श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे मी खूप दु:खी आहे. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका आणि अजरामपर अभिनयासाठी त्यांचे नेहमीच स्मरण केले जाईल. मी त्यांच्या परिवारातील सदस्यांबद्दल अन् चाहत्यांबद्दल विचार करीत आहे. मात्र त्याहीपेक्षा मला त्यांच्या दोन्ही मुलींची प्रचंड चिंता वाटत आहे. मी त्यांची मोठी मुलगी जान्हवीच्या आईची भूमिका साकारत आहे. मी त्यांच्याबद्दल अन् त्यांची मुलींबद्दल असलेली ट्युनिंग जाणून आहे. 

शालिनी यांनी पुढे बोलताना म्हटले की, श्रीदेवी आणि जान्हवी यांच्यातील प्रेम मी शब्दात सांगू शकत नाही. त्यामुळे जान्हवीप्रती मी खूपच हळवी तर होत नाही ना असे मला वाटत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. दरम्यान, गेल्या शनिवारी रात्री श्रीदेवी यांचे हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून निधन झाले. श्रीदेवी या परिवारासह दुबई येथे मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. सुरुवातीला असे म्हटले जात होते की, त्यांचे निधन हृदयविकाराच्या धक्क्याने झाले असावे. परंतु जेव्हा पोस्टमार्टमचा अहवाल समोर आला तेव्हा त्यांच्या निधनाचे वेगळचे कारण समोर आले. विशेष म्हणजे त्यांच्या शरीरात दारूचे अंश सापडल्याचे त्यात नमूद केले गेले. 



दरम्यान, जान्हवी कपूरच्या ‘धडक’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करीत आहेत. हा चित्रपट मराठीतील ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला नाही. 

Web Title: Janshavi Kapoor's Anskrine 'Mom' thinks Sridevi's two daughters are worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.