अनवाणी पायांनी तिरूपतीच्या दर्शनासाठी पोहोचली जान्हवी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 14:04 IST2020-02-10T14:03:51+5:302020-02-10T14:04:43+5:30

सोमवारी जान्हवी तिरूपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचली.

janhvi kapoor visits tirupati barefoot | अनवाणी पायांनी तिरूपतीच्या दर्शनासाठी पोहोचली जान्हवी कपूर

अनवाणी पायांनी तिरूपतीच्या दर्शनासाठी पोहोचली जान्हवी कपूर

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जान्हवीकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. लवकरच ती गुंजन सक्सेना हिच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अल्पावधीतच रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. जान्हवी सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  जान्हवी कपूर मॉडर्न आहे. पण तेवढीच संस्कारी आहे. सोमवारी पहाटे जान्हवी आंध्र प्रदेशातील तिरूपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. अनवाणी पायांनी सुमारे 12 किमीची टेकडी चढून जान्हवीने भगवान तिरूपतीचे दर्शन घेतले.


जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मंदिराच्या पाय-या चढताना दिसतेय. तर एका फोटोत मार्गात काही क्षण विश्रांती घेताना दिसतेय.

व्हाईट कलरचा सलवार आणि त्यावर पिवळी ओढणी अशा अगदी सिंपल लूकमध्ये जान्हवी तिरूपतीच्या दर्शनाला पोहोचली.
याआधी ‘धडक’ या आपल्या पहिल्या सिनेमाच्या रिलीजआधी जान्हवीने कुटुंबासोबत तिरूपती बालाजीला साकडे घातले होते. यानंतर आई श्रीदेवीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ती तिरूपतीच्या दर्शनाला गेली होती.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर जान्हवीकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. लवकरच ती गुंजन सक्सेना हिच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यात ती फाईटर पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय राजकुमार रावसोबत ‘रूही अफ्जा’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘तख्त’ या सिनेमातही ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘दोस्ताना’च्या सीक्वलमध्ये ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.


 

Web Title: janhvi kapoor visits tirupati barefoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.