तुम्ही हिला ओळखलंत का? जानूचा हा व्हिडीओ पाहून उडेल अंगाचा थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 17:23 IST2021-03-10T17:22:46+5:302021-03-10T17:23:33+5:30
भूतिया वेडिंग ऑफ द इअर... पाहा व्हिडीओ

तुम्ही हिला ओळखलंत का? जानूचा हा व्हिडीओ पाहून उडेल अंगाचा थरकाप
अभिनेत्री जान्हवी कपूरचे ग्लॅमरस फोटो तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण भीतीने गाळण उडेल असा तिचा अवतार तुम्ही पाहिला नसेन. होय, जान्हवीचा ‘रूही’ हा सिनेमा उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि त्याआधी जान्हवीने या सिनेमाचा ‘भूत लूक’ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रूही चित्रपटात जान्हवी कपूर चेटकीणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
याच सिनेमाची एक क्लिप जान्हवीने शेअर केली आहे. ‘भूतिया वेडिंग ऑफ द इअर,’ असे लिहित तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये जान्हवीशिवाय राजकुमार राव आणि वरूण शर्मा दिसतात. व्हिडीओच्या सुरुवातीला राजकुमार दिसतो, मग वरूण शर्मा आणि यानंतर जान्हवी. नववधूच्या वेशात आरशासमोर तयार होत असलेली ही जान्हवी पाहून अंगाचा क्षणभर थरकाप उडतो.
अशी आहे चित्रपटाची कथा
‘रूही’ची कहाणी एका चेटकिणीची आहे, जिची लग्न सोहळा असणाº्या घरांवर नजर आहे. नवरदेव झोपला की, ती नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते. राजकुमार राव आणि वरुण शर्मा हा जादूटोणा दूर करण्याची जबाबदारी स्वीकारतात. यासाठी दोघही जान्हवीला पळवून नेतात आणि तिच्या आतून चेटकीण बाहेर कढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. या सगळ्यामध्ये प्रेक्षकांना कॉमेडी देखील पाहायला मिळणार आहे.
दिनेश विजन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. याआधी राजकुमार व दिशेन विजान या दोघांनी ‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात एकत्र काम केले होते. राजकुमार राव ‘स्त्री’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.