जान्हवी कपूर घाबरवण्यासाठी, राजकुमार राव व वरूण शर्मा हसविण्यासाठी सज्ज, 'रूही'चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 19:09 IST2021-02-16T19:09:01+5:302021-02-16T19:09:45+5:30
अभिनेता राजकुमार राव, वरूण शर्मा आणि जान्हवी कपूर यांचा आगामी चित्रपट रुहीचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

जान्हवी कपूर घाबरवण्यासाठी, राजकुमार राव व वरूण शर्मा हसविण्यासाठी सज्ज, 'रूही'चा ट्रेलर रिलीज
अभिनेता राजकुमार राव, वरूण शर्मा आणि जान्हवी कपूर यांचा आगामी चित्रपट रुहीचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट हॉरर-कॉमेडी असून तिघांचाही यामध्ये जबरदस्त लूक दिसत आहे.
रुही चित्रपटात जाह्नवीच्या अंगात एक भूत शिरते आणि राजकुमार राव आणि वरुण शर्मा जाह्नवी कपूरचे अपहरण करतात, परंतु या अपहरणानंतर तिचे रूप बदलते. जाह्नवीच्या अंगातून भूत काढण्यासाठी राजकुमार राव आणि वरुण शर्मा अनेक उपायोजना करताना दिसत आहेत. या चित्रपटात कॉमेडीबरोबर हॉरर सीन दाखवण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. “भूतिया शादी में आपका स्वागत है” असे कॅप्शन देत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. राजकुमार रावचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. कॉमेडीचा तडका देण्यासाठी रुही’ सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शर्मा दिसणार आहे. तसेच पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना देखील चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहताने केले आहे.
रुही हा चित्रपट दिनेश विजानचा हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा दुसरा भाग आहे. त्याचा पहिला भाग ‘स्त्री’ होता जो २०१८मध्ये रिलीज झाला होता. राजकुमार राव ‘स्त्री’ चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यामध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसली होती. स्त्री चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. यानंतर दिनेश विजानने आता याचा दुसरा भाग घेऊन आला आहे. रुही चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.