‘धडक’नंतर जान्हवी कपूरसाठी असा आहे पापा बोनी कपूरचा प्लान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 06:42 IST2018-07-23T13:19:24+5:302018-07-24T06:42:53+5:30
धडक’सोबत जान्हवीच्या करिअरची धडाकेबाज सुरूवात झाली आहे. त्यामुळे ‘धडक’नंतर जान्हवी कुठला चित्रपट करेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

‘धडक’नंतर जान्हवी कपूरसाठी असा आहे पापा बोनी कपूरचा प्लान!
‘धडक’ अपेक्षेनुसार हिट चित्रपटांच्या यादीत गेला आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ३३ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. साहजिकचं याचा सर्वाधिक फायदा जान्हवी कपूरला मिळणार आहे. ‘धडक’सोबत जान्हवीच्या करिअरची धडाकेबाज सुरूवात झाली आहे. त्यामुळे ‘धडक’नंतर जान्हवी कुठला चित्रपट करेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप याबद्दल जान्हवीने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, जान्हवी कपूरचा पुढचा चित्रपट तिच्या होम प्रॉडक्शनचा असणार आहे. म्हणजेच, पापा बोनी कपूर यांच्या चित्रपटात जान्हवी झळकणार आहे. तूर्तास बोनी कपूर यांनी याबाबतचा प्लान उघड केलेला नाही. पण जान्हवीसाठी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘जान्हवीचा दुसरा चित्रपट तिच्या ‘धडक’ इमेजच्या अगदी वेगळा असावा, असे त्यांचे मत आहे.
तुम्हाला ठाऊक आहेच की, याआधी बोनी कपूर यांनी श्रीदेवींचा ‘जुदाई’ आणि अर्जुन कपूरचा ‘तेवर’ प्रोड्यूस केला तर अनिल कपूरसाठी त्यांनी ‘मिस्टर इंडिया’ची निर्मिती केली. आता जान्हवीसाठी ते काय सरप्राईज घेऊन येतात, ते लवकरच कळेल. अलीकडे एका मुलाखतीत जान्हवीने तिची आई श्रीदेवी हिच्या ‘सदमा’च्या रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
‘धडक’बद्दल सांगायचे तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सआॅफिसवर जोरदार सुरूवात केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८ कोटी ७१ लाख कमावले. दुसऱ्या दिवशी ११.४ कोटी तर तिस-या दिवशी १३. ९२ कोटींचा गल्ला जमवला.