Janhvi Kapoor ला फोटोग्राफरने विचारला प्रश्न, विक्कीच्या लग्नाला जाणार का? वाचा काय मिळालं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 14:43 IST2021-12-06T14:41:34+5:302021-12-06T14:43:31+5:30
जान्हवी कपूर सोमवारी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. जान्हवी एअरपोर्टमधून आपल्या गाडीकडे जात होती. तेव्हा तिला फोटोग्राफरने घेरलं होतं.

Janhvi Kapoor ला फोटोग्राफरने विचारला प्रश्न, विक्कीच्या लग्नाला जाणार का? वाचा काय मिळालं उत्तर
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे. विक्की आणि कतरिना लग्नासाठी राजस्थानला रवाना झाल्याची माहिती आहे. अशात हे सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे की, या कपलच्या लग्नाला कोणकोणते सेलिब्रिटी जाणार आहेत. अशात जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) फोटोग्राफरने विचारलं की, तुम्ही विक्कीच्या लग्नात जाणार आहात का?
जान्हवी कपूर सोमवारी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. जान्हवी एअरपोर्टमधून आपल्या गाडीकडे जात होती. तेव्हा तिला फोटोग्राफरने घेरलं होतं. अशात एक फोटोग्राफर जान्हवी कपूरला हॅलो बोलतो. मग तिला विचारतो की, 'मॅम तुम्ही लग्नात जात आहात का?'. यानंतर जान्हवी त्याच्याकडे वेगळेच डोळे करून ती बघते. त्यानंतर तो पुन्हा जान्हवीला विचारलं की, 'विक्की भावाच्या'. मग ती हसू लागते. त्यावर जान्हवी काहीच न बोलता केवळ लूक देते आणि निघून जाते.
कियारानेही टाळलं उत्तर
हे पहिल्यांदाच नाही की, कुण्या सेलिब्रिटीने विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नावर बोलण्यास टाळलं. आजतक अजेंडा २०२१ मध्ये कियारा अडवाणीनेही विक्कीच्या लग्नाबाबत बोलणं टाळलं. ती म्हणाली होती की, तिला लग्नाला बोलवण्यात आलं नाही. विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनीही लग्नावर काहीच सांगितलं नाही.