जान्हवी कपूरलाही पडली ट्रेंडिंग ‘खलासी’ गाण्याची भुरळ; केला जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 13:30 IST2023-10-29T13:27:36+5:302023-10-29T13:30:54+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरलाही 'खलासी'  गाण्याची भुरळ पडली.

Janhvi Kapoor dance on trending song Khalasi | जान्हवी कपूरलाही पडली ट्रेंडिंग ‘खलासी’ गाण्याची भुरळ; केला जबरदस्त डान्स

जान्हवी कपूरलाही पडली ट्रेंडिंग ‘खलासी’ गाण्याची भुरळ; केला जबरदस्त डान्स

सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड व्हायरल होतात. सामान्य लोकांसह अगदी मोठमोठे सेलिब्रिटीही ते फॉलो करतात. सध्या 'खलासी' हे गाणे खूप व्हायरल झाले आहे. या गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्यावरील डान्स रीलचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच आता बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरलाही 'खलासी'  गाण्याची भुरळ पडली आहे.  जान्हवीने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

 जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तिनं सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली असून केसात गजरा लावला आहे.  हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. 


अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे. ती शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र दोघांनी यावर मौन बाळगले आहे. नुकताच या कपलचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये दोघेही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. 


अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अलीकडेच वरुण धवनसोबत 'बवाल' चित्रपटात दिसली होती. आता लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'देवरा' या चित्रपटात ती पाहायला मिळणार आहे.  'देवरा'मध्ये अभिनेत्री ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. याशिवाय अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ 2' मध्येही झळकणार असल्याची बातमी आहे. 

Web Title: Janhvi Kapoor dance on trending song Khalasi