जान्हवी कपूरने असा केला तिचा वाढदिवस सेलिब्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 11:04 IST2018-03-07T05:34:51+5:302018-03-07T11:04:51+5:30

श्रीदेवी यांचे निधन २४ फेब्रुवारीला दुबई येथे झाले. त्यांच्या निधनानंतर काहीच दिवसांत म्हणजेच ६ मार्चला त्यांची मुलगी जान्हवी कपूरचा ...

Janhavi Kapoor celebrates her birthday | जान्हवी कपूरने असा केला तिचा वाढदिवस सेलिब्रेट

जान्हवी कपूरने असा केला तिचा वाढदिवस सेलिब्रेट

रीदेवी यांचे निधन २४ फेब्रुवारीला दुबई येथे झाले. त्यांच्या निधनानंतर काहीच दिवसांत म्हणजेच ६ मार्चला त्यांची मुलगी जान्हवी कपूरचा वाढदिवस होता. जान्हवी काल २१ वर्षांची झाली. दरवर्षी जान्हवीची अम्मा म्हणजेच श्रीदेवी लेकीचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करायच्या. जान्हवीच्या २१ व्या वाढदिवसासाठीही श्रीदेवी यांनी मुलीसाठी खास प्लान केला होता. त्यामुळे श्रीदेवी यांनी आखलेल्या प्लान नुसारच जान्हवीचा वाढदिवस साजरा केला गेला. 
आपल्या वाढदिवशी जान्हवी आनंदी राहावी, असे बोनी आणि कपूर कुटुंबाला वाटत असल्याने संपूर्ण कपूर कुटुंबियांनी मिळून तिच्या वाढदिवसाची तयारी केली. जान्हवीने दरवर्षीप्रमाणे केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या या वाढदिवसाचे फोटो तिची चुलत बहीण सोनम कपूरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवीच्या वाढदिवसाला तिची बहीण खुशी, अंशुला, चुलत बहीण सोनम, शान्या आणि तिचे वडील बोनी कपूर, काका संजय कपूर आणि संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. जान्हवीने तिच्या वाढदिवसाची सुरुवात वृद्धाश्रमाला भेट देऊन केली. श्रीदेवी हयात असताना जान्हवी तिच्या वाढदिवसाची सुरुवात अशीच करत असे. 
जान्वहीची चुलत बहीण सोनम कपूरने जान्हवीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कपूर कुटुंबाच्या मुली असे कॅप्शन दिले. 

सोनम कपूर आणि मनीष मल्होत्राने सोशल मीडियाद्वारे दिल्या शुभेच्छा
जान्हवीचा यंदाचा वाढदिवस केवळ तिच्यासाठीच नाही तर कपूर कुटुंबासह त्यांच्या जवळच्या मित्रांसाठीही प्रचंड हळवा करणारा क्षण होता. जान्हवीची चुलत बहीण सोनम कपूर, कपूर कुटुंबाचा अतिशय जवळचा मित्र आणि फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा यांनी जान्हवीला सोशल मीडियाद्वारे विश केले. सोनमने जान्हवीचा एक फोटो पोस्ट करत तू माझ्यापेक्षाही स्ट्राँग आहे, हॅपी  बर्थ डे जानू, असे लिहिले आहे तर मनीष मल्होत्रा यांनी जान्हवीला बर्थ डे विश करताना तिला जगातील सगळा आनंद, प्रेम, शांती मिळो, अशी कामना केली आहे.
लवकरच जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ रिलीज होतो आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवी बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.

Also Read : अशी झाली होती श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची पहिली भेट

Web Title: Janhavi Kapoor celebrates her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.