"मला ऑडिशन द्यायचंय...", जान्हवी कपूरनं दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत मागितलं काम, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 09:29 IST2022-12-06T09:28:13+5:302022-12-06T09:29:17+5:30

जाव्हवी कपुरने चक्क एका दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत ऑडिशन द्यायची आहे असे म्हणले. कोण आहे तो सुपरस्टार ज्याच्यासोबत काम करण्यासाठी जान्हवी ऑडिशन द्यायलाही तयार होती.

janhavi-kapoor-called-vijay-setupati-and-asked-for-audition-as-she-is-big-fan-of-south-superstar | "मला ऑडिशन द्यायचंय...", जान्हवी कपूरनं दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत मागितलं काम, पण...

"मला ऑडिशन द्यायचंय...", जान्हवी कपूरनं दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत मागितलं काम, पण...

बॉलिवुड अभिनेत्री जान्हवी कपुर प्रसिद्ध निर्माते बोनी कपुर यांची मुलगी आहे. त्यामुळे तिच्याकडे कामासाठी कोणासमोर हात पसरण्याची गरज नाही असं जर वाटत असेल तर असे नाहीए. जाव्हवी कपुरने चक्क एका दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत ऑडिशन द्यायची आहे असे म्हणले. कोण आहे तो सुपरस्टार ज्याच्यासोबत काम करण्यासाठी जान्हवी ऑडिशन द्यायलाही तयार होती. (South Superstar)

'या' सुपरस्टारची चाहती आहे जान्हवी

साऊथ फिल्म इंडस्ट्री सध्या खुप नाव कमवत आहे. एकापेक्षा एक हिट चित्रपट साऊथमधुन येत आहेत. तर बॉलिवुड अभिनेत्री जान्हवी कपुरलाही साऊथ फिल्म इंडस्ट्रीने भुरळ घातली आहे. सुपरस्टार विजय सेतुपती आणि ज्युनियर एनटीआर सोबत काम करण्याची इच्छा जान्हवी बोलून दाखवली. इतकेच नाही तर ती विजय सेतुपतीची मोठी चाहती आहे. तिने सेतुपती चा नानम राऊडी १०० वेळा बघितलाय. त्यातले डायलॉगही तिला पाठ आहेत. 

ऑडिशनसाठी केला फोन

तिला मनापासून दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. जान्हवी सांगते, 'मला असे कळले की एकाकडे विजय सेतुपतीची नंबर आहे. मी त्यांना फोन केला आणि सांगितले की मी तुमची खुप मोठी चाहती आहे. जर तुमच्याकडे माझ्यासाठी काम असेल तर मी नक्कीच ऑडिशन द्यायला तयार आहे. मला खरंच तुमच्यासोबत काम करायचे आहे.'

यावर विजय सेतुपतीची प्रतिक्रिया काय होती असे विचारले असता जान्हवीने सांगितले, 'ते फक्त अइयो..अइयो बोलत होते. मला समजलेच नाही त्यांना राग आलाय की ते लाजले. पण त्यांना आश्चर्य नक्कीच वाटले. मी इतक्या उत्साहात बोलत असल्याने ते फार काही बोलले नाही. '

जान्हवीचा नुकताच मिली हा चित्रपट रिलीज झाला. या सिनेमाची आणि तिच्या अभिनयाची खुप प्रशंसा झाली.लवकरच जान्हवी आणि वरुण धवनचा 'बवाल' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: janhavi-kapoor-called-vijay-setupati-and-asked-for-audition-as-she-is-big-fan-of-south-superstar