Jallikattu:वर PETA Indiaने कमल हासनला दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 18:34 IST2017-01-24T13:03:17+5:302017-01-24T18:34:54+5:30

जलीकट्टूच्या समर्थनार्थ मैदानात उतरुन पेटा इंडियावर सवाल उपस्थित करणा-या सुपरस्टार कमल हासनला पेटा इंडियाने उत्तर दिले आहे. ‘पीपल फॉर इथिकल ...

Jallikattu: PETA India gave answer to Kamal Hassan | Jallikattu:वर PETA Indiaने कमल हासनला दिले उत्तर

Jallikattu:वर PETA Indiaने कमल हासनला दिले उत्तर

n lang="MR" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">जलीकट्टूच्या समर्थनार्थ मैदानात उतरुन पेटा इंडियावर सवाल उपस्थित करणा-या सुपरस्टार कमल हासनला पेटा इंडियाने उत्तर दिले आहे. पीपल फॉर इथिकल ट्रिटमेंट ऑफ ऍनिमल्स अर्थात पेटा इंडिया या संस्थेच्या नावातच प्राण्यांबद्दलचा कळवळा दिसून येतो. भारतात प्राण्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी ही संस्था झटत असते. कमल हासन यांनी उल्लेख केलेली पेटा अमेरिका ही संस्था प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी काम करत आहे. 1980 पासून ही संस्था अमेरिकेत काम करते आहे. याचा उल्लेख कमल हासन यांनी केला होता. प्राण्यांची विशेषतः बैलांची झुंज अमेरिकेत ही कायद्याविरोधात आहे. हीच प्रथा ब्रिटन, नेदरलँडस आणि इतर भागातही आहे. स्पेनमध्येसुद्धा बैलांची झुंज ही बेकायदेशीर आणि कायद्याविरोधातच आहे. त्यामुळे आमची संस्था ही प्राण्यांना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून झटत आहे असे उत्तर पेटा इंडियाने अभिनेता कमल हासन याला दिले आहे. याआधी जलीकट्टूच्या समर्थनार्थ कमल हासननं विधान केलं होतं.  वाहनांमुळे अपघात होऊन लोकांचे जीव जात असतीलतर वाहनांवरही बंदी घालणार काअसा सवाल कमल हसनने विचारला होता.देशातल्या अनेक कायद्यांमध्ये अमूलाग्र बदलांची गरज असल्याचंही कमल हसनने म्हटलं होतं. शिवाय कोणत्याही प्रकारच्या बंदीविरोधात आपण असल्याचं त्याने सांगितलं होतं. 

ALSO READ: रजनीकांतसोबत काम करण्यास कमल हासन राजी; पण?

 

Web Title: Jallikattu: PETA India gave answer to Kamal Hassan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.