जयदीप अहलावतने 'अॅनिमल'मधील बॉबी देओलच्या कामाचं केलं कौतुक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 21:51 IST2023-12-05T21:50:46+5:302023-12-05T21:51:30+5:30
Jaideep Ahlawat : जाने जान फेम अभिनेता जयदीप अहलावत याने सोशल मीडियावर बॉबी देओलचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

जयदीप अहलावतने 'अॅनिमल'मधील बॉबी देओलच्या कामाचं केलं कौतुक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता बॉबी देओल(Bobby Deol)ने 'अॅनिमल' (Animal Movie) या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. बॉबी देओलने खलनायकाच्या भूमिकेत सर्वांची मने जिंकली आहेत, त्यामुळे बॉबीच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. या अभिनेत्याला खलनायकाच्या भूमिकेत पाहून सगळेच प्रभावित झाले आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता जयदीप अहलावत(Jaideep Ahlawat)ने सोशल मीडियावर बॉबी देओलचे कौतुक केले आहे.
नेटफ्लिक्स चित्रपट 'जाने जाने'मध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांना प्रभावित करणाऱ्या जयदीप अहलावतला रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' चित्रपट खूप आवडला आहे. विशेषत: चित्रपटातील बॉबी देलॉलच्या नकारात्मक भूमिकेने जयदीपचे मन जिंकले आहे. जयदीप अहलावतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर बॉबीशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये जयदीप आणि बॉबी एकत्र दिसत आहेत. जयदीप अहलावतने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, पाजी, शेवटी तुम्हाला भेटून खूप आनंद झाला." 'अॅनिमल' तुझे खूप खूप अभिनंदन. यासोबतच मला आशा आहे की लवकरच आम्ही एकत्र काम करताना दिसणार आहोत. अशातच जयदीप अहलावतने बॉबी देओलचे खूप कौतुक केले आहे. हे देखील स्वाभाविक आहे कारण बॉबी देओलने 'अॅनिमल'मध्ये ज्याप्रकारे अभिनय केला आहे, त्याचे पुरेसे कौतुक होत नाही.
'अॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई
रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल या कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ‘अॅनिमल’ हा चित्रपट खूपच प्रभावी ठरत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. परिस्थिती अशी आहे की 'अॅनिमल'ने सर्व भाषांमध्ये २४६ कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.