‘जग्गा जासूस’ वाद पेटणार; रणबीर कपूरने घेतली गोविंदाची बाजू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 22:12 IST2017-07-09T16:42:09+5:302017-07-09T22:12:09+5:30

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाभोवतीचा वाद थांबता थांबेना. अगोदरच उद्भवणाºया अडचणींमुळे शूटिंगमध्ये विघ्न येत ...

Jagga Spokesman will debate; Ranbir Kapoor took Govinda's side! | ‘जग्गा जासूस’ वाद पेटणार; रणबीर कपूरने घेतली गोविंदाची बाजू!

‘जग्गा जासूस’ वाद पेटणार; रणबीर कपूरने घेतली गोविंदाची बाजू!

बीर कपूर आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाभोवतीचा वाद थांबता थांबेना. अगोदरच उद्भवणाºया अडचणींमुळे शूटिंगमध्ये विघ्न येत असल्याने हा चित्रपट तब्बल तीन वर्ष लांबला गेला. आता हा चित्रपट पुढील आठवड्यात म्हणजेच १४ जुलैला रिलीज होणार असून, चित्रपटामागील वाद अजूनही कायम आहे. आताचा वाद अभिनेता गोविंदा याच्यावरून उफाळून येत असून, त्याची भूमिका ऐनवेळी काढल्याने तो निर्मात्यांवर नाराज असल्याचे समजते. याविषयी त्याने वेळोवेळी बोलूनही दाखविले आहे. आता त्याची बाजू घेण्यासाठी रणबीर कपूर सरसावल्याने हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. 

‘जग्गा जासूस’ या चित्रपटात रणबीर-कॅट व्यतिरिक्त गोविंदाचीही प्रमुख भूमिका होती. चित्रपटात त्याची भूमिका काय असेल याबाबतचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च केले होते. मात्र ट्रेलरमध्ये गोविंदाला स्थानच दिले गेले नसल्याने त्याने जाहीरपणे याविषयी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय गोविंदाच्या चाहत्यांनाही त्याची झलक बघण्याची आतुरता लागली होती. अशात चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, गोविंदाचा जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो फोटो शूटिंगदरम्यानचा आहे. 

पुढे बोलताना अनुरागने स्पष्ट केले होते की, चित्रपटाच्या कथेत काहीसा बदल केल्याने गोविंदाची भूमिका चित्रपटातून काढण्यात आली आहे. या प्रकारामुळे नाराज झालेल्या गोविंदाने अखेर ट्विटरवर याविषयीची चुप्पी तोडली होती. त्याने अनुरागवर आपला सर्व राग व्यक्त केला होता. मात्र असे करताना त्याने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता. परंतु गोविंदाचा राग शांत करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. आता गोविंदाला रणबीरनेच पाठिंबा दिल्याने हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. 

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार रणबीरने म्हटले की, ‘हे सगळं काही अचानकच घडले आहे. परंतु जे घडले ते चुकीचे आहे. यामध्ये माझी आणि अनुरागची चूक आहे. वास्तविक चित्रपटाची कथा ऐनवेळी बदलण्यात आली आहे. त्यामुळे गोविंदाजींवर एक प्रकारचा अन्याय झाला आहे. हे खरोखरच वाईट झाले आहे. मात्र हा निर्णय घेताना चित्रपटाचे हित लक्षात घेतले गेले, असेही रणबीरने स्पष्ट केले. 

Web Title: Jagga Spokesman will debate; Ranbir Kapoor took Govinda's side!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.