जॅकलिन फर्नाडीसला व्हायचे आहे ‘अॅक्शन आयकॉन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 18:22 IST2017-02-17T12:52:09+5:302017-02-17T18:22:09+5:30
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नाडीसला बॉलिवूडमध्ये आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करायची आहे. बॉलिवूडमधील अॅक्शन गर्ल म्हणून ओळख मिळावी यासाठी ...

जॅकलिन फर्नाडीसला व्हायचे आहे ‘अॅक्शन आयकॉन’
श रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नाडीसला बॉलिवूडमध्ये आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करायची आहे. बॉलिवूडमधील अॅक्शन गर्ल म्हणून ओळख मिळावी यासाठी जॅकलिन प्रयत्न करीत असून तिच्या हाती दोन अॅक्शनपट लागले असल्याचे समजते. बॉलिवूडमध्ये मला अॅक्शन आयक ॉन म्हणून ओळख मिळाली तर ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ठरले असे जॅकलिनने सांगितले.
अभिनेता टायगर श्रॉफ व जॅकलिन फर्नाडीसची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ फ्लार्इंग जट’ या चित्रपटात तिने पहिल्यांदा अॅक्शन केली होती. आता तिच्या हाती ‘रिलोड’ व ‘ड्राईव’ हे दोन अॅक्शनपट आले असून यात ती अॅक्शन दृश्ये करताना दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटात अॅक्शन दृश्ये साकारण्यासाठी जॅकलिन उत्सुक आहे. जॅकलिन म्हणाली, अॅक्शन ही शानदार शैली आहे, मी अशी दृश्ये सहज साकारू शकते असे मला वाटते. जर मी बॉलिवूडमध्ये अॅक्शन आयकॉन बनू शकले तर ती माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ठरेल. अॅक्शन चित्रपटात महिलांची भूमिका पुरुष अभिनेत्यांच्या तुलनेत फारच कमी असते. जर महिलांना अॅक्शन दृश्ये साकारायला मिळाली तर त्याचा पडद्यावरचा वावर वाढू शकतो. जर माझ्या वाटणीला अॅक्शन दृश्ये आली तर मी ती आनंदाने करेल.
![]()
आपल्या मताला दुजोरा देताना जॅकलिन म्हणाली, जेव्हा बॉलिवूडमध्ये महिलाकेंद्रित अॅक्शन चित्रपटांची गोष्ट आपण करतो तेव्हा बॉलिवूडला हॉलिवूडचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही. तेथे महिलाकेंद्रित अॅक्शन चित्रपटांची निर्मिती केली जाते. आपण जर टायगर श्रॉफच्या शैलीचे अनुकरण केले तर आपल्याला पश्चिमेकडून बरेच काही शिकता येऊ शकते. अॅक्शन हिरो म्हणून त्याच्यात मोठे पोटाँशिअल आहे. तो स्वत: आपले स्टंट करतो आणि त्याला चांगल्या पद्धतीने करतो, जसे पश्चिमेत केले जाते.
जॅकलिन फर्नांडीसने आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखविली आहे. मात्र तिच्या समोर तापसी पन्नूचे आव्हान असल्याचे दिसते. तापसीने ‘बेबी’मध्ये अॅक्शन दृश्ये साकारली होती व तिचा ‘नाम शबाना’ हा अॅक्शनपट लवकरच रिलीज होणार आहे. अर्थातच आता अॅक्शन आयकॉन म्हणून दोन अभिनेत्रींमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.