जॅकलिन फर्नांडिसचा खासगी फोटो लीक होताच हात जोडून, म्हणाली- मी कठीण काळातून जात आहे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 10:46 IST2022-01-09T09:46:53+5:302022-01-09T10:46:05+5:30

सोशल मीडियावर सुकेश जॅकलिन (Jacqueline Fernandez)ला किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

Jacqueline fernandez released statement after kiss love bite picture with conman sukesh chandrasekhar viral | जॅकलिन फर्नांडिसचा खासगी फोटो लीक होताच हात जोडून, म्हणाली- मी कठीण काळातून जात आहे....

जॅकलिन फर्नांडिसचा खासगी फोटो लीक होताच हात जोडून, म्हणाली- मी कठीण काळातून जात आहे....

Jacqueline Fernandez Viral Photo: २०० कोटी रूपयांच्या फसवणुकीप्रकरणी तुरूंगात असलेला सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)च्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शनिवारी सोशल मीडियावर एक फोटोही व्हायरल झाला. फोटोत सुकेश चंद्रशेखर किस करताना दिसला. फोटोमध्ये जॅकलिन फर्नांडिसच्या गळ्यावर लव्ह बाइट दिसला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलिनने सोशल मीडियावर स्टेटमेंट जारी केलं आहे. 

जॅकलीनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने लिहिले- 'या देशातील जनतेने मला नेहमीच प्रेम आणि आदर दिला आहे. यामध्ये माझ्या मीडियामधील मित्रांचा समावेश आहे ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आहे. मी सध्या कठीण काळातून जात आहे पण मला आशा आहे की माझे मित्र आणि चाहते माझ्यासोबत असतील .मी माझ्या सर्व मीडियामधील मित्रांना विनंती करू इच्छितो की अशा प्रकारे माझे कोणतेही फोटो व्हायरल  करू नका, कारण त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत हे करणार नाही. मला आशा आहे की तुम्ही हे करणार नाही. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मलाही तो मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद.'

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुकेश जॅकलिनला किस करताना दिसत आहे. इतकंच नाही तर जॅकलिनच्या मानेवर लव्ह बाइटही दिसत आहे. जॅकलिनने प्रिंटेड टॉप घातला आहे. तेच सुकेश हुडीमध्ये दिसत आहे. याआधीही सुकेश आणि जॅकलिनचे प्रायव्हेट फोटो समोर आले होते. 

Web Title: Jacqueline fernandez released statement after kiss love bite picture with conman sukesh chandrasekhar viral