सुरु झाली ‘आंखे’च्या सीक्वलची तयारी! लीड रोलमध्ये दिसणार जॅकलिन फर्नांडिस!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 12:40 IST2019-03-13T12:39:15+5:302019-03-13T12:40:23+5:30
गेल्या काही वर्षांत अनेक धमाकेदार चित्रपटाचे सीक्वल बनलेत. जुन्या गाजलेल्या चित्रपटाचे हे सीक्वल कधी हिट ठरलेत तर कधी फ्लॉप. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. हा गाजलेला चित्रपट कुठला तर २००२ मध्ये प्रदर्शित झालेला थ्रीलर चित्रपट ‘आंखे’.

सुरु झाली ‘आंखे’च्या सीक्वलची तयारी! लीड रोलमध्ये दिसणार जॅकलिन फर्नांडिस!!
ठळक मुद्देजॅकलिनकडे तूर्तास फार काम नाही. यापूर्वी सलमान खानच्या ‘रेस 3’मध्ये ती अखेरची दिसली होती. यानंतर तिने धर्मा प्रॉडक्शनचा ‘ड्राईव्ह’ हा सिनेमा साईन केला.
गेल्या काही वर्षांत अनेक धमाकेदार चित्रपटाचे सीक्वल बनलेत. जुन्या गाजलेल्या चित्रपटाचे हे सीक्वल कधी हिट ठरलेत तर कधी फ्लॉप. आता आणखी एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. हा गाजलेला चित्रपट कुठला तर २००२ मध्ये प्रदर्शित झालेला थ्रीलर चित्रपट ‘आंखे’. होय, गेल्या काही दिवसांपासून ‘आंखे’च्या सीक्वलची चर्चा रंगतेय. आता पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे. एका ताज्या बातमीनुसार, ‘आंखे’च्या सीक्वलच्या कास्टिंगचे काम सुरु आहे. या सीक्वलसाठी अमिताभ बच्चन यांचे नाव फायनल मानले जात आहे. याशिवाय जॅकलिन फर्नांडिस हिच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सीक्वलमध्ये पाच मुख्य पात्र आहेत. चार मेल आणि एक फिमेल. मिस्टर बच्चन यात लीड रोलमध्ये दिसतील. त्यांच्याशिवाय परेश रावल यांचीही भूमिका असेल. अन्य भूमिकांसाठी ए-लिस्ट स्टारशी संपर्क केला जात आहे. फिमेल लीडसाठी जॅकलिनच्या नावाला मेकर्सनी पसंती दिली आहे. अनीस बज्मी याचे दिग्दर्शन करणार आहेत. सूत्रांनी सांगितल्यानुसार, सगळे काही फायनल झाल्यावर चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा होणार आहे.
जॅकलिनकडे तूर्तास फार काम नाही. यापूर्वी सलमान खानच्या ‘रेस 3’मध्ये ती अखेरची दिसली होती. यानंतर तिने धर्मा प्रॉडक्शनचा ‘ड्राईव्ह’ हा सिनेमा साईन केला. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत झळकणार होती. पण हा चित्रपट मध्येच लटकला. त्यामुळे ‘आंखे 2’ची आॅफर आली असेल तर जॅक ती नाकारणार नाही. तेव्हा जॅकच्या होकाराची आणि ‘आंखे’च्या घोषणेची प्रतीक्षा करूया...