रोहित शेट्टीच्या 'सर्कस'च्या सेटवर जाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 21:04 IST2020-11-04T21:03:43+5:302020-11-04T21:04:14+5:30
लवकरच जॅकलिन रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.

रोहित शेट्टीच्या 'सर्कस'च्या सेटवर जाण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस उत्सुक
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने बरेच ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. लवकरच जॅकलिन रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर जाण्यासाठी जॅकलिन खूप उत्सुक आहे.
रोहित शेट्टीची प्रशंसा करताना जॅकलिन फर्नांडिस म्हणाली की, असे चित्रपट बनणे सोप्पे नाही जे तुमचे मनोरंजन करतात, तुम्हाला हसवितात आणि छान वाटतात. रोहित शेट्टी असा व्यक्ती आहे ज्याचे नाव मनोरंजक आणि कमर्शियल चित्रपटाबद्दल विचार केल्यावर सर्वात पहिल्यांदा येते.
पुढे जॅकलिन म्हणाली की, मी नेहमीच त्याचे चित्रपट एन्जॉय केले आहेत आणि यासाठी लागणाऱ्या मेहनतीशी परिचित आहे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्साही आहे आणि सर्कसच्या सेटवर जाण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहते आहे.
जॅकलिन फर्नांडिस कठोर मेहनतीसाठी ओळखली जाते. या प्रोजेक्टसाठी जास्त मेहनत आणि धमाल करण्यासाठी तयार आहे. सर्कस चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे.
जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच मुंबईत एक प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. त्यानंतर ती भूत पुलिस सिनेमाच्या शूटिंगसाठी धर्मशाला येथे रवाना झाली आहे. लवकरच ती रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीसोबत सर्कसच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. त्यानंतर ती सलमान खानसोबत किक 2चे शूटिंग करणार आहे.