'कुंग फू योगा'च्या प्रमोशनसाठी जॅकी चैन आला मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 14:19 IST2017-01-23T08:49:32+5:302017-01-23T14:19:32+5:30

'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अॅक्शन स्टार जॅकी चैन मुंबईत दाखल झाले आहेत. अभिनेता सोनू सूद, अमायरा दस्तूर ...

Jackie Chan came in for promotion of 'Kung Fu Yoga' in Mumbai | 'कुंग फू योगा'च्या प्रमोशनसाठी जॅकी चैन आला मुंबईत

'कुंग फू योगा'च्या प्रमोशनसाठी जॅकी चैन आला मुंबईत

'
;कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अॅक्शन स्टार जॅकी चैन मुंबईत दाखल झाले आहेत. अभिनेता सोनू सूद, अमायरा दस्तूर आणि दिशा पटानी ही कुंग फू योगा या चित्रपटात झळकणार आहेत. आज संध्याकाळी जॅकी चैन प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 


कुंग फू योगा हा एक अॅक्शन एडव्हेंचर कॉमेडी चित्रपट आहे. जॅकी चैनचा हा चित्रपट 3 फेब्रुवारीला भारतात प्रदर्शित होणार आहे तर भारताच्या 3 दिवस आधी 28 जानेवारीला चायना प्रदर्शित होणार आहे.  कुंग फू योगा हा चित्रपट स्टैनले टोंगने दिग्दर्शित केला आहे. 

जॅकी चैन हे बॉलिवूड चित्रपटांचे चाहते आहेत. त्याच्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यात त्याला सलमानला भेटण्याची इच्छा असल्याचे कळतेय. जॅकीने सलमानसाठी डिनर आयोजित केल्याची ही चर्चा आहे. जॅकी चैनचा कुंग फू योगा चित्रपटातीलसह कलाकार सोनू सूद हा सलमान खानच्या जवळच्या व्यक्तिंपैकी एक असल्याने त्यांने जॅकी आणि सलमानच्या भेटीचा कार्यक्रम आधीच आयोजित केला आहे. तसेच तो कपिल शर्माच्या शोमध्ये ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. जॅकी चैनच्या चित्रपटाचा भारतात मोठा प्रेक्षक वर्ग आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाला भारतात चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.  



याआधी xxx दी रिर्टन ऑफ झेंडर केज या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन डिझेल मुंबईत येऊऩ गेला. त्याचा हा मुंबई दौरा दीपिका पादुकोणने आयोजित केला होता. विन डिझेलच्या  xxx दी रिर्टन ऑफ झेंडर केज हा चित्रपट भारतात सर्वात आधी प्रदर्शित करण्यात आला होता. 

Web Title: Jackie Chan came in for promotion of 'Kung Fu Yoga' in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.