सलमान खान नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्यावर युलिया वंतूरचं क्रश, दबंग खानबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:55 IST2025-12-16T15:54:24+5:302025-12-16T15:55:20+5:30
सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळे नेहमीच चर्चेत राहणारी रोमानियन सुंदरी युलियानं तिच्या 'क्रश'बद्दल खुलासा केला.

सलमान खान नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्यावर युलिया वंतूरचं क्रश, दबंग खानबद्दल म्हणाली...
बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' सलमान खानच्या जवळच्या व्यक्तींमध्ये युलिया वंतूरचं नाव अग्रक्रमाने येतं. युलिया आणि सलमानचं खास नातं आहे. सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळे नेहमीच चर्चेत राहणारी रोमानियन सुंदरी युलियानं तिच्या 'क्रश'बद्दल खुलासा केला. तिचा क्रश हा सलमान खान नसून तर एक दुसराच अभिनेता आहे.
युलिया वंतूर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सर्वांना चकित केले आहे. युलियाने तिच्या 'क्रश'बद्दल खुलासा केला. दैनिक भास्करशी झालेल्या संभाषणात जेव्हा युलिया ला विचारण्यात आले की, रोमानियात असताना तिचा कोणता भारतीय अभिनेता 'क्रश' होता? तेव्हा तिने अतिशय स्पष्टपणे कबीर बेदी यांचे नाव घेतले.
युलिया म्हणाली, "कबीर बेदी यांच्यावर माझ क्रश होतं आणि नेहमीच राहील. मी लहानपणापासूनच त्यांची खूप मोठी चाहती आहे. ते त्यांच्या कामासाठी युरोपमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. ते खूप देखणे आहेत आणि मला त्यांना अनेकदा भेटण्याची संधीही मिळाली आहे". तसेच कबीर बेदींशिवाय युलियाने आपण राज कपूर यांचीही मोठी चाहती असल्याचे सांगितले. लहानपणी तिने त्यांचे अनेक चित्रपट पाहिले आहेत.
युलियाचा बॉलिवूडमधील प्रवास सोपा नव्हता. परदेशी असल्याने तिला अनेकदा ट्रोलिंग, नकारात्मकता आणि एकाकीपणाचा सामना करावा लागला. एक वेळ अशी आली होती की तिने सर्व काही सोडून भारतातून परत जाण्याचा विचार केला होता. पण अशा कठीण काळात सलमान खान तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. सलमानच्या विश्वासामुळेच युलियाने भारतात राहून फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावले. आज तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सलमानसोबत चित्रपटात दिसणार?
चाहत्यांना नेहमीच प्रश्न पडतो की युलिया सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर कधी दिसणार? यावर तिने अतिशय स्पष्ट उत्तर दिले. ती म्हणाली, "सलमान खानचे व्यक्तिमत्व खूप मोठे आहे आणि मी त्याचा एक भाग आहे हे माझे भाग्य समजते. पण सध्या तरी मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. हा माझा स्वतःचा स्वतंत्र प्रवास आहे".