शाहरूखच्या 'कल हो ना हो'मधील या चिमुरडीला ओळखणं झालंय कठीण, आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 19:25 IST2021-03-03T19:25:10+5:302021-03-03T19:25:40+5:30
एकेकाळी शाहरूख खानसोबत कल हो ना हो मध्ये काम करणारी झनक शुक्ला आता अभिनयापासून दूर आहे.

शाहरूखच्या 'कल हो ना हो'मधील या चिमुरडीला ओळखणं झालंय कठीण, आता दिसते अशी
टेलिव्हिजन आणि चित्रपटातून कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी बालकलाकार झनक शुक्ला आता मोठी झाली आहे. मात्र आता ती लाइमलाइटपासून दूर आहे. एकेकाळी शाहरूख खानसोबत कल हो ना हो मध्ये काम करणारी झनक शुक्ला आता अभिनयापासून दूर आहे. ती अभिनय सोडून आर्कियोलॉजिस्ट बनली आहे. तिला इतिहासात आवड आहे.
शाहरूख खानने चित्रपटाशिवाय मालिका करिश्मा का करिश्मामधून झनक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. तिचा क्यूट अंदाज आजही प्रेक्षकांना भावतो. झनकला वयाच्या १५व्या वर्षी अभिनयातून ब्रेक घ्यावा लागला. कारण तिला तिचे जीवन आरामात जगायचे होते. तिला जास्त लाइमलाइटमध्ये रहायचे नव्हते. तिने बालपणी बरेच काम केले होते. अशात तिला आगामी जीवन आरामदायी जगायचे होते. झनकला इतिहासात खूप रूची आहे. तिला मोठे काहीतरी करायचे आहे. न्यूजीलँडमधील एका म्युझिअममध्ये काम करण्याचे स्वप्न पाहते आहे. मात्र पैशांच्या अभावामुळे ती दुविधेत अडकली आहे. ती मस्करीत सांगते की तिच्याकडे पैसे नाहीत.
तिला खूप काही करायचे आहे पण कमी पैशांमुळे ती कन्फ्यूज्ड आहे. झनकला तिच्या आई वडिलांचा सपोर्ट मिळाला आहे. त्यांच्या सांगण्यावरून ते त्यांचे पॅशन फॉलो करू शकते आहे.
झनकने स्वतःला सिनेइंडस्ट्रीपासून दूर केले आहे. तर दुसरीकडे तिचा लूकदेखील बदलला आहे.
स्लिम ट्रीम दिसणारी झनक आता थोडी हेल्दी झाली आहे. तिला नवीन लूकमध्ये ओळखणंही कठीण झाले आहे.