अक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 12:36 IST2018-09-24T12:20:35+5:302018-09-24T12:36:09+5:30

आजकाल बॉलिवूडमध्ये अभिनेता-अभिनेत्री प्रत्येक सिनेमात आपला लूक सतत चेंज करत असतात. कधी कधी तर त्यांना ओळखणं ही कठीण जाते. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रींना असाच आपला लूक चेंज केला आहे ज्यामुळे तिला ओळखणं शक्य होत नाहीय.

Its difficult to recognize akshay kumars this co star | अक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण

अक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण

ठळक मुद्देअक्षय कुमारसोबत गोल्ड सिनेमातून मौनीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे मौनी सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते

आजकाल बॉलिवूडमध्ये अभिनेता-अभिनेत्री प्रत्येक सिनेमात आपला लूक सतत चेंज करत असतात. कधी कधी तर त्यांना ओळखणं ही कठीण जाते. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रींना असाच आपला लूक चेंज केला आहे ज्यामुळे तिला ओळखणं शक्य होत नाहीय, चला आम्हीच तुम्हाला सांगतो कोण आहे ती  अभिनेत्री, ही अभिनेत्री  आहे मौनी रॉय. 


अक्षय कुमारसोबत गोल्ड सिनेमातून मौनीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. याचबरोबर तिने 'रॉ: रोमियो अकबर वॉल्टर' सिनेमाचे शूटिंग देखील पूर्ण केले आहे. यात ती जॉन अब्राहमच्या अपोझिट दिसणार आहे. याशिवाय ती रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये देखील दिसणार आहे.  मौनी सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते नेहमीच ती स्वत:चे फोटो शेअर करत असते. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, अगदी अलीकडे मौनीला एक वेबसीरिज ऑफर झाली. पण याची फी हिना खानला मिळणाऱ्या रकमेपेक्षाही कमी होती. मग काय, मौनीला ही गोष्ट जाम खटकली. ‘गोल्ड’ हिट झाल्यानंतर मौनीने प्रति एपिसोड ३ लाख रूपये फी मागितली होती. ही इतकी मोठी रक्कम वेबसीरिजच्या निर्मात्यांच्या बजेटबाहेर होती. पण मौनी एक पैसाही कमी करायला तयार नव्हती. मग काय, तिने हा प्रोजेक्ट सोडणेच योग्य समजले. काही दिवसांपूर्वी मौनीला तिचा कथित एक्स-बॉयफ्रेन्ड मोहित रैनासोबत एक जाहिरात आॅफर झाली होती. पण मौनीने ही आॅफर धुडकावून लावली. कदाचित बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेताच, मौनी रॉयने टीव्हीला पूर्णपणे मागे सोडले आहे. 

Web Title: Its difficult to recognize akshay kumars this co star