Katrina Kaif PhoneBhoot: लग्नानंतर पहिल्याच चित्रपटात कतरिना बनणार 'भूत'; सिद्धांत, इशानची होणार हवा गुल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:18 PM2022-10-04T18:18:16+5:302022-10-04T18:19:07+5:30

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Its Confirmed Katrina Kaif to Play Ghost in PhoneBhoot featuring Ishan Khattar Siddhant Chaturvedi horror comey movie | Katrina Kaif PhoneBhoot: लग्नानंतर पहिल्याच चित्रपटात कतरिना बनणार 'भूत'; सिद्धांत, इशानची होणार हवा गुल!

Katrina Kaif PhoneBhoot: लग्नानंतर पहिल्याच चित्रपटात कतरिना बनणार 'भूत'; सिद्धांत, इशानची होणार हवा गुल!

googlenewsNext

Katrina Kaif PhoneBhoot: तुम्ही कधी सुंदर भूताची गोष्ट ऐकली आहे का? जर नसेल तर आता लवकरच तुम्हाला एका सुंदर आणि तितकीच बिनधास्त असलेल्या एका भूताला पाहता येणार आहे. कारण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हॉरर-कॉमेडी सिनेमा 'फोन भूत' येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत तुम्ही भूत हे अतिशय वाईट पद्धतीने मेकअप केलेले पाहिले असेल पण 'फोन भूत'मध्ये चक्क सौंदर्यवती बॉलिवूडची अभिनेत्री कतरीना कैफ भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

कतरिना, सिद्धांत आणि ईशान खट्टर यांचा हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची सारेच वाट पाहत आहेत. कतरिना कैफसारखी सुंदर परीसारखी अभिनेत्री भूताच्या भूमिकेत नक्की कशी दिसेल, याकडेच साऱ्या फॅन्सची नजर खिळली आहे. त्यासह चित्रपटाच्या कास्टिंगबाबतही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. चित्रपटाच्या जेव्हा घोषणा झाली, तेव्हापासूनच या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. 'फोन भूत' हा चित्रपट एक मजेशीर हॉरर-कॉमेडी असणार आहे.

'फोन भूत' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे त्यामुळे या चित्रपटाची कथा आणि इतर तपशील याविषयी प्रेक्षकांना बरीच माहिती असली तरी, एक मोठे कुतूहल चित्रपटातील भुताच्या पात्राबद्दल प्रेक्षकांमध्ये होते. मात्र आता या प्रश्नाचे उत्तर मिळणार असून या चित्रपटात कतरिना कैफ एका सुंदर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत आपण कतरीना कैफला विविध चित्रपटांमध्ये फक्त ग्लॅमरस भूमिका करताना पाहिलेलं आहे. त्यामुळे कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर भूताच्या भूमिकेत कशी दिसेल, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, कतरिनाला पडद्यावर अशा अनोख्या भूमिकेत पाहणे दर्शकांसाठी खूप रोमांचक असणार आहे.

बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी कतरिना ही महत्त्वाची अभिनेत्री आहे. आता ती भूताच्या रूपात वेगळ्या प्रकारची मोहिनी घेऊन येते आहे. चित्रपट रसिकांसाठी तिचा हा चित्रपट नक्कीच एक पर्वणी असणार आहे. 'फोन भूत' हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे देखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता आहे. अलीकडेच, इंटरनेटद्वारे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सेटवर धम्माल करताना दिसले. त्यामुळे आता या तिघांची चित्रपटातील केमिस्ट्री पाहाण्यासाठी सारेच खूप उत्सुक आहेत. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित फोन भूत चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Web Title: Its Confirmed Katrina Kaif to Play Ghost in PhoneBhoot featuring Ishan Khattar Siddhant Chaturvedi horror comey movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.