its shocking : वरुण धवन म्हणतो आलियाचा विषय नकोच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 13:33 IST2017-07-28T08:03:09+5:302017-07-28T13:33:09+5:30

वरुण धवन आणि आलिया भट्ट क्युट जोडीने 'स्टुडंट ऑफ द इयर' ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. यानंतर अनेक हिट ...

Its astonishing: Varun Dhawan is not called the subject of Aliya | its shocking : वरुण धवन म्हणतो आलियाचा विषय नकोच

its shocking : वरुण धवन म्हणतो आलियाचा विषय नकोच

ुण धवन आणि आलिया भट्ट क्युट जोडीने 'स्टुडंट ऑफ द इयर' ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. यानंतर अनेक हिट चित्रपट या जोडीने बॉलिवूडला दिले. काही दिवसांपूर्वीच बॉक्स ऑफिस रिलीज झालेल्या 'ब्रदीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटाने चांगली कमाई केली.या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना नेहमीच आवडते. नुकताच वरुण धवन नेहा धुपियाच्या ऑडिओ चॅट शोमध्ये आला होता. यावेळी त्याला आलिया बाबत प्रश्न विचारण्यात आला यावर वरुणने जे उत्तर दिले ते सगळ्यांनाचा प्रश्नात टाकणारे होते. नेहाने वरुणला विचारले तू तुझ्या मैत्रिणीला आणि को स्टार असलेल्या आलियाला का सल्ला देशील? यावर उत्तर देत वरुण म्हणाला की, ''मी आलियाला कोणताच सल्ला देऊ इच्छित नाही. खरंतर मला आलियाबद्दल काही बोलायचे नाही आहे. ती जे काही करते ते तिच्या हिशोबाने करते आणि याचा प्रत्यत तिला लवकरच येईल आणि तिच्या बद्दल कोणतिही कंमेंट करण्यात मला इंटरेस्ट नाही.'' 
वरुणच्या या विधानाने सगळ्यांना आश्चर्यात टाकले आहे. वरुण आलियाला आपली खास मैत्रिणी मानत होता आपल्या खास मैत्रिणीबदल तो असे का बोलला ? आपण ऐवढेच म्हणू शकतो आलिया आणि वरुणच्या मैत्रित सगळे अलबेल असेल. 
वरुण 'जुडवा2' मध्ये दिसणार आहे. हा जुडवाचा रिमेक आहे. यात वरुणसह जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. सलमान ही यात कॅमिओ करणार आहे. तर आलिया सध्या राजी आणि ड्रॅगनच्या तयारीत व्यस्त आहे. राजीच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.    

Web Title: Its astonishing: Varun Dhawan is not called the subject of Aliya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.