​ही होती शाहरुख खानची पहिली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 15:35 IST2017-11-02T10:05:37+5:302017-11-02T15:35:37+5:30

शाहरुख खानने आज करोडोने पैसे कमवला आहे. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी करोडोहून अधिक रुपये घेतो. आज बॉलिवूडचा बादशहा त्याला ...

It was Shahrukh Khan's first earning | ​ही होती शाहरुख खानची पहिली कमाई

​ही होती शाहरुख खानची पहिली कमाई

हरुख खानने आज करोडोने पैसे कमवला आहे. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी करोडोहून अधिक रुपये घेतो. आज बॉलिवूडचा बादशहा त्याला मानले जाते. पण शाहरुख खानने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल केले आहे. शाहरुखने छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. शाहरुखची बॉलिवूड क्षेत्रात आल्यानंतर पहिली कमाई किती होती हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
शाहरुख खानची पहिली कमाई ही केवळ ५० रुपये होती. शाहरुख खानने पंकज उदाज यांच्या कॉर्न्स्टमध्ये काम केले होते. याच कॉर्न्स्टसाठी त्याला ५० रुपये मिळाले होते. या पैशांचे त्याने काय केले होते याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल. या पैशांची त्याने काही तरी वस्तू घेतली असेल अथवा कोणाला तरी या पैशांचे गिफ्ट घेतले असेल असे तुम्हाला वाटले असेल. पण त्याने असे काहीच केले नाही. शाहरुखने त्या पैशात ट्रेनने प्रवास केला होता. त्या पैशात शाहरुखने ट्रेनने आग्रापर्यंतचा प्रवास केला होता. 
शाहरुख खानच्या वडिलांचे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये कॅन्टिन होते. त्यामुळे त्याने रोहिणी हट्टंगडी, सुरेखा सिक्री, राज बब्बर यांचा अभिनय लहानपणापासूनच पाहिला आहे. यामुळेच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्याने फौजी, सर्कस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आर्मी या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले असल्यामुळे त्याला दिल आशना है या चित्रपटासाठी हेमा मालिनी यांनी ऑफर दिली. इथूनच शाहरुखच्या चित्रपटातील करियरला सुरुवात झाली. दिल आशना है हा शाहरुखने साइन केलेला पहिला चित्रपट असला तरी त्याचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट हा दिवाना आहे. दिवाना या चित्रपटातील शाहरुखची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. 
दिल तो पागल है, दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, चेन्नई एक्सप्रेस, डॉन, मोहोब्बते, रब ने बना दी जोडी, ओम शांती ओम, बाजीगर, डर यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट शाहरुखने बॉलिवूडला दिले आहेत. 

Also Read : या चित्रपटांमुळे शाहरुख खान बनला सुपरस्टार, मात्र निर्मात्यांची पहिली चॉईस नव्हता किंगखान

Web Title: It was Shahrukh Khan's first earning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.