'साहो'मध्ये प्रभाससोबत काम करणे सोप्प नव्हते म्हणतोय, नील नितिन मुकेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 15:11 IST2017-10-27T09:41:03+5:302017-10-27T15:11:03+5:30

साहो चित्रपटाची शूटिंग सध्या हैदराबादमध्ये सुरु आहे. या चित्रपटासाठी नील नितिन मुकेश खूपच मेहनत घेतो आहे. एका इंटरव्ह्यु दरम्यान ...

It was not easy to work with Prabhas in 'Saoho', Neil Nitin Mukesh | 'साहो'मध्ये प्रभाससोबत काम करणे सोप्प नव्हते म्हणतोय, नील नितिन मुकेश

'साहो'मध्ये प्रभाससोबत काम करणे सोप्प नव्हते म्हणतोय, नील नितिन मुकेश

हो चित्रपटाची शूटिंग सध्या हैदराबादमध्ये सुरु आहे. या चित्रपटासाठी नील नितिन मुकेश खूपच मेहनत घेतो आहे. एका इंटरव्ह्यु दरम्यान नीलला प्रभाससोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत विचारण्यात आले. यावर नील म्हणाला, प्रभाससोबत काम करणे खूपच कठिण आहे. जेवढी मजा येते आहे तेवढेच ते कठिणसुद्धा आहे. आम्ही तीन भाषेत या चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. त्यामुळे प्रत्येक सीनसला तीन वेळा तीन भाषांमध्ये शूट करावे लागते.   

साहो तामिळ, हिंदी आणि तेलुगू भाषेमध्ये तयार करण्यात येतो आहे. याचित्रपटासाठी नीलने आपल्या जिमचे संपूर्ण शेड्यूल चेंज केले आहे. नीलने सांगितले कि क्लायमॅक्सच्या मागणीनुसार मी माझ्या बॉडीवर काम करतो आहे. प्रभास आणि नीलशिवाय याचित्रपटात , श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ आणि चंकी पांडे यांच्यासुद्धा भूमिका आहेत. साहो पूर्णपणे एक मॉडर्न एक्शन चित्रपट आहे. साहोचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहातायेत. प्रेक्षक प्रभासला मॉडर्न अंदाजातला हिरोच्या रुपात बघण्यासाठी उत्सुक आहेत. नुकताच प्रभासचा वाढदिवस झाला. प्रभासच्या वाढदिवसाच्या दिवशी साहोचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले. या पोस्टरमध्ये प्रभास सूटाबुटात दिसतोय. अंधारलेली धुक्यांची चादर वेढलेली रात्र आणि धुक्यातून एकटा चालत येणारा,चेहरा झाकलेला प्रभास असे हे पोस्टर कमालीचे इंटरेस्टिंग आहे. प्रभासचा आणि श्रद्धा कपूरच्या जोडीचा हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात श्रद्धाचा डबल रोल आहे. साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट 150 कोटी रुपये इतके आहे. सुजीथ दिग्दर्शित ‘साहो’ पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

ALSO READ : ​काही तासांत पकडली गेली ‘बाहुबली’ प्रभासची ‘चोरी’! हॉलिवूडची केली कॉपी!!

सूत्रांचे खरे मानाल तर, ‘साहो’ हा स्वातंत्र्याचीपूवीर्ची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील. सध्या रामोजी फिल्म सिटीत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. यासाठी स्वातंत्र्यापूर्वीचा सेट उभारण्यात आला आहे.

Web Title: It was not easy to work with Prabhas in 'Saoho', Neil Nitin Mukesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.