ही भूमिका साकारणास माधुरी दीक्षितने दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 11:46 IST2017-12-30T05:54:28+5:302017-12-30T11:46:31+5:30

बॉलिवूड धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने 90 चा दशक गाजवला होता. 3 वर्षांपूर्वी ती डेढ इश्किया या चित्रपटात दिसली होती. ...

It was Madhuri Dikshit who refused to play this role | ही भूमिका साकारणास माधुरी दीक्षितने दिला होता नकार

ही भूमिका साकारणास माधुरी दीक्षितने दिला होता नकार

लिवूड धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने 90 चा दशक गाजवला होता. 3 वर्षांपूर्वी ती डेढ इश्किया या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाहीय. तिचे फॅन्स तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहता येते.   

काही दिवसांपूर्वी माधुरीने अनिल कपूरचा आगामी चित्रपट टोटल धमाल साईन केल्याची चर्चा होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार माधुरी दीक्षितने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  माधुरीला एका खूप चांगल्या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आले होते. मात्र माधुरीला जसे कळले ती आईची भूमिका आहे. तिने यासाठी नकार दिला. तिला असे वाटतेय तिच्या फॅन्सना तिला शाहरुख खान, सलमान खानच्या अपोझिट बघायचे आहे. काही वर्षांपूर्वी अनिल कपूरने माधुरीला फ्रीकी फ्राइडे वर आधारित चित्रपटात सोनम कपूरच्या आईची भूमिका ऑफर केली होती. तिने या भूमिकेसाठी नकार दिला होता. माधुरीला ती भूमिका काही आवडली नाही आणि मुळातच तिला आईची भूमिका साकारण्यात रसही नव्हता. सध्याच्या घडीला तरुण अभिनेत्री करत असलेल्या भूमिका तिला मिळायला हव्यात असे माधुरीला वाटत होते.

90 च्या दशकातील इतर अभिनेत्री करिष्मा कपूर, जुही चावला यांना आईची भूमिका ऑफर झाली तर त्यांना  घाम फुटायला लागल्याचा. या यादीत आता माधुरीचे नाव देखील सामील झाल्याचे एक अभिनेत्री म्हटले आहे.  

ALSO READ : #MeeToo : अनु कपूरचा खुलासा; माधुरी दीक्षितने रेप सीन करण्यास दिला होता नकार!!


तसेच माधुरी लवकरच एका मराठी चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.  माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी या चित्रपटाची कथा खूपच चांगली आणि हटके आहे. आपल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या एका स्त्रीचा प्रवास प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असून माधुरी एका कणखर पण त्याचसोबत खट्याळ स्त्रीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवसकर करणार असून ही कथा देखील त्यांनी आणि धनश्री शिवडेकर यांनी मिळून लिहिली आहे.  या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे.

Web Title: It was Madhuri Dikshit who refused to play this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.