-तर हे आहे हृतिक-सुजैन यांच्या घटस्फोटामागील कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 16:08 IST2016-06-12T10:38:45+5:302016-06-12T16:08:45+5:30
सन २०१३ मध्ये हृतिक रोशन आणि सुजैन यान यांचे १७ वर्षांचे नाते संपुष्टात आले. हृतिक व सुजैन यांना बॉलिवूडमधील ...

-तर हे आहे हृतिक-सुजैन यांच्या घटस्फोटामागील कारण
स २०१३ मध्ये हृतिक रोशन आणि सुजैन यान यांचे १७ वर्षांचे नाते संपुष्टात आले. हृतिक व सुजैन यांना बॉलिवूडमधील परफेक्ट कपल मानल्या जात असतानाच अचानक त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. ही बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. अर्थात हृतिक व सुजैनचे नाते इतके विकोपाला का गेले, हे कळालेले नव्हते. यामागची अनेक कारणे सांगितली गेली. कधी हृतिकचे अफेअर तर कधी सुजैनची अर्जून रामपालसोबतची जवळीक़ पण सत्य काय, हे समोर आले नव्हतेच. पण आता प्रथमच सुजैनने हृतिकसोबतच्या घटस्फोटामागचे कारण सांगितले आहे. हृतिक व माझ्यातील नाते एका अशा वळणावर पोहोचले होते, जिथून पुढे आम्हा दोघांसाठीही वेगळे राहणेच उत्तम होते. बनावट नाते सांभाळण्यापेक्षा सत्य स्वीकारणेच आम्ही चांगले समजले, असा खुलासा सुजैनने केला आहे. अद्यापही आम्ही चांगले मित्र आहोत. सोबत असताना आम्ही जितके बोलत नव्हतो, त्यापेक्षा अधिक आत्ता आम्ही चॅट करतो. आम्हा मुलांसाठी आम्ही दोघेही कमालीचे कमिटेड आहोत. आमच्या मनात एकमेकांप्रती आदर आहे. मुलांसोबत असतो तेव्हा मतभेद विसरून आम्ही जगतो, असेही सुजैन म्हणाली. व्वा, सुजैन...याला म्हणतात समजुतदारपणा..बेव्हो,गर्ल!