अ सुटेबल बॉय! २४ वर्ष मोठ्या तबूसोबत किसींग सीन, ईशान खट्टर म्हणाला, "सेटवर ती खूपच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:24 IST2025-05-26T17:23:37+5:302025-05-26T17:24:39+5:30
तबूसोबत दिला किसींग सीन, कसं होतं सेटवरचं वातावरण? ईशान खट्टरची प्रतिक्रिया

अ सुटेबल बॉय! २४ वर्ष मोठ्या तबूसोबत किसींग सीन, ईशान खट्टर म्हणाला, "सेटवर ती खूपच..."
ईशान खट्टर (Ishaan Khatter) बॉलिवूडमधील उभरता चेहरा आहे. 'होमबाऊंड' या सिनेमात त्याने काम केलं आहे. या सिनेमाचा नुकताच कान्समध्ये प्रीमियर पार पडला. यामध्ये जान्हवी कपूर आणि विशाल जेठवाही मुख्य भूमिकेत आहेत. करण जोहरने सिनेमाची निर्मिती केली आहे. याआधी ईशान खट्टर २०२० साली आलेल्या 'अ सुटेबल बॉय' मधून चर्चेत आला होता. यामध्ये त्याने चक्क २४ वर्ष मोठी अभिनेत्री तब्बूसोबत (Tabu) किसींग सीन दिले होते.
'अ सुटेबल बॉय' ही वेबसीरिज मीरा नायरने दिग्दर्शित केली होती. यामध्ये तान्या मानिकतला, ईशान खट्टर, शहाना गोस्वामी, माहिरा कक्कर आणि तब्बू हे कलाकार होते. सर्वांनीच दमदार परफॉर्मन्स दिले होते. मात्र ईशान आणि तब्बूच्या त्या किसींग सीनची चांगलीच चर्चा झाली. नुकतंच ईशानने त्यावर प्रतिक्रिया दिली. झूमला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मला वाटतं याचं श्रेय लेखकाला जातं. जर तुम्ही मला आणि तब्बूला वेगळ्या कहाणीत कुंवा वेगळ्या क्रिएशनमध्ये ठेवलं आणि वयातील अंतराकडे दुर्लक्ष केलं तर हे वेगळं वाटलं असं. पण ते अशा पद्धतीने लिहिण्यात आलं होतं ज्यामुळे आम्हाला तसं काम करता आलं. मी तब्बूसोबत काम करताना अजिबातच नर्वस नव्हतो. तिने मला अगदीच कंफर्टेबल केलं होतं."
"ती खूप खोडकर आहे. सेटवर ती एखाद्या लहान मुलीप्रमाणेच असायची. मस्ती करायची. मग अचानक ती तिच्या भूमिकेत बुडून जायची. त्यामुळे तिच्यासोबत काम करणं हा सुंदर अनुभव होता. मजेशीर होता. आपण जे करु त्यात जीवंतपणा आणणं महत्वाचं असतं. तुम्ही न बोलता कसा संवाद साधू शकता? पण तब्बूसोबत सगळंच सोपं झालं. असं वाटलं आम्ही डोळ्यातून एकमेकांशी संवाद साधत आहोत."